छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- आगामी कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37(1) व 37(3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी हे आदेश निर्गमित केले असून हे आदेश दि.22 नोव्हेंबर ते दि.6 डिसेंबर पर्यंत अंमलात राहतील,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
What's Your Reaction?