समृध्दी महामार्गावर खाजगी ट्राव्हल्सचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, 18 जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू
समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; दोन प्रवाशांचा मृत्यू, 18 प्रवासी जखमी
फुलंब्री, दि.24(डि-24 न्यूज)- समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सचा अपघात होऊन दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 18 प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे 1.10 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई मार्गावर चैनल क्रमांक 426, नायगाव शिवार, ता. फुलंब्री,येथे हा अपघात घडला.
ट्रॅव्हल्स क्रमांक MH-41-ZH-9955 ही नागपूर येथून मुंबईच्या दिशेने 38 प्रवाशांना घेऊन जात होती. प्राथमिक माहितीनुसार, प्रवासादरम्यान चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स महामार्गावर पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
पोलिसांकडून तातडीने मदतकार्य...
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व पोलीस स्टेशन फुलंब्रीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये प्रभारी अधिकारी सोनाली पाईकराव (prob DySP), PSI सुग्रीव चाटे, PSI राम बाराहते, HC नागलोत, HC बागल तसेच SDPO पूजा नागरे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून मदतकार्याचे समन्वयन केले.
पोलिसांनी स्थानिक मदत यंत्रणा व रुग्णवाहिकांच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातातील मृत प्रवासी
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या खालील दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रघुनंदन दत्ता सांगळे, वय 26 वर्षे, रा. वेस्ट मुंबई.
विनोद उत्तम जाधव, रा. घोसगाव, ता. आर्णी, जि. यवतमाळ.
जखमी प्रवाशांचा तपशील...
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
अर्जुन पंडित खडसे, रा. खडी, ता. पुसद.
अजय वाघू भामुळकर, रा. पातोडा, जि. हिंगोली.
देवानंद नथ्थुसिंग राठोड, रा. माळोणी, ता. आर्णी, जि. यवतमाळ.
शुभम सुरेश वंजारी, रा. कवडापूर तांडा, ता. पुसद.
लीला केशव दाभाडे, रा. अंजूर, भिवंडी, जि. ठाणे.
केशव मुकुंद दाभाडे, रा. अंजूर फाटा, भिवंडी, जि. ठाणे.
रेखा अतुल लोहे, रा. गोकुळ पार्क, वसई, जि. पालघर.
अन्नपूर्णा पंडित खडसे, रा. हुंडी, ता. पुसद.
रमेश दत्तात्रय भोपळे, रा. पातळी पाडा, मुंबई.
गयाबाई मासोळकर, रा. पोफाळी कारखाना, ता. उमरखेड, जि. यवतमाळ.
दत्ता सुभाष जाधव, रा. सावंगी, ता. पुसद, जि. यवतमाळ.
छाया दत्ता सांगडे, रा. वेस्ट मुंबई.
शिवानी अंकुश राठोड, रा. पुसद.
वंदना विनोद जाधव, रा. पुसद.
जयकुमार संजय खंडारे, रा. पुसद, जि. यवतमाळ.
अरुणा भूमेकर, रा. कळम, जि. यवतमाळ.
मोहम्मद (पूर्ण नाव व पत्ता पडताळणी बाकी).
फारुख मोहम्मद अजीज, रा. वसंतनगर, पुसद, जि. यवतमाळ.
सर्व जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, येथे उपचार सुरू आहेत.
चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई
सदर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक प्रवीण शिवाजी राजेकर, रा. मुंगळा, ता. मालेगाव, जि. वाशिम याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती फुलंब्री पोलिसांनी दिली आहे.
What's Your Reaction?