रिक्षाचालकांचा चक्का जाम, स्मार्ट सिटी बस फुल, व्यवसाय चोरल्याचा रिक्षाचालकांचा आरोप....!
ऑटोरिक्षा चक्का जाम आंदोलनाने वाहतूक विस्कळित, स्मार्ट सिटी बसच्या व्यवसायात वाढ....
छत्रपती संभाजनगर,
आज सकाळपासून राष्ट्रीय ड्रायवर संयुक्त मोर्चा समीतीच्या वतीने रिक्षा चालक मालकांनी राज्यस्तरीय एकदिवसीय चक्का जाम आंदोलन केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम दिसून आला. शहरात रेल्वे स्टेशन, सेंट्रल बस स्टँड, सिडको बसस्थानक व बाजारपेठेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. रिक्षाचालकांनी प्रवाशांना बसवून रस्त्यावर धावणाऱ्या ऑटो रिक्षांना अडवून प्रवासी खाली उतरवले. खाजगी बसमध्ये प्रवासी बसले असताना खाली उतरवले. तर काही ठिकाणी रिक्षांच्या चाकामधील हवा काढण्यात आली. यामुळे काही ठिकाणी बाचाबाची व वादविवाद बघायला मिळाले. महापालिकेच्या वतीने शहरात अतिरिक्त बस रस्त्यावर उतरवले. या सर्व बस प्रवाशांना फुल भरुन रस्त्यावर धावत होते यामुळे स्मार्ट सिटी बसच्या गल्ल्यातील उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीच्या बसमध्ये सुरू असलेली प्रवासी वाहतूक थांबवावी. ओला, उबेर, बाईक टॅक्सी व अवैध वाहतूक बंद करावी अशी मागणी रिक्षा चालक मालकांनी केली आहे. या अवैध प्रवासी वाहतूकीमुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय चोरला आहे यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. दहा दिवसांत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यानंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राष्ट्रीय ड्रायवर संयुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सलीम खामगांवकर यांनी इशारा दिला आहे. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. बाबा पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यामध्ये रिक्षा सह मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक यांनी सहभाग घेतला.
निवेदनावर या मागणी करण्यात आली आहे....
शासकीय कामकाजाचे खाजगीकरण थांबविणे व तसेच आरटीओ कार्यालयाचे खाजगी ATS फिटनेस सेंटर तात्काळ बंद करून शासकीय तिजोरीची आर्थिक लुट आणि वाहन कायद्याचे उल्लंघन करून देण्यात येणाऱ्या फिटनेस सर्टिफिकेट अवैध व्यापार थांबवावे. ओला, उबेर, रॅपिडो टॅक्सी अॅप बंद करावा. कंपनी बसेसचे होणारे अवैध वाहतूक तात्काळ बंद करावे. ऑनलाईन चालान देताना अनावश्यक व चुकीच्या पद्धतीने चालान देऊन चालकांवर आर्थिक भुर्दंड देत असल्याने ऑनलाइन चालन पध्दतीत फेरबदल करावे. वाहनचालक सुरक्षा कायदा बनवण्यात यावा. शहरात रिक्षा थांबे व तसेच Pick up Point देऊन शेकरींग दर निश्चित करावे व तसेच मीटर दरवाढ करावी. कल्याणकारी महामंडळाची घोषणा झालेली आहे. परंतु अंमलबजावणी झाली नाही सदरील कायदा अंमलात आणावा. वाहन चालकांना चालक दिवस कॅलेंडर मध्ये सामावून घोषित करण्यात यावे. रॅपिडो बाईक टॅक्सीवर आरटीओ प्रशासनाने एफआयआर दाखल केले आहे त्याची प्रत सोबत जोडली आहे. रेल्वे स्टेशन येथील स्मार्ट सिटी ऑफीसवर लावलेले लाऊडस्पिकर बंद करावे. स्मार्ट सिटी बस हि 24 तास चालू कोणत्या आदेशानुसार आहे. त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागातील स्मार्ट सिटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात यावी.
निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलीम खामगांवकर, जिल्हाध्यक्ष वसिम सिद्दीकी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी वाय.एफ.खान, शेख लतीफ, शेख बशीर, सुरेश जाधव, बळीराम प्रधान, जाकेर पठाण, वसीम खान, फेरोज खान पहेलवान, शेख मोहसीन, दिपक अंभोरे, गणेश सुपेकर, प्रकाश शेंडगे, शेख अखिल, गजानन वानखेडे, नाहिद फारुकी, शेख जुबेर, दत्ता नागरे, लतीफ खान जब्बार खान, मोईन इनामदार, जमील वडोदकर, इम्रान पठाण, मुजाहिद जहागिरदार, अब्दुल रशीद खान (अज्जूभाई) आदींचे नावे
आहेत.
What's Your Reaction?