रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाचा निर्घुनपणे खून...

 0
रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाचा निर्घुनपणे खून...

जालाननगर उड्डाणपूलाखाली रिक्षाचालकाचा निर्घृण खून...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगर परिसरात आज बुधवारी रात्री तब्बल 4 ते 5 हल्लेखोरांनी एका रिक्षाचालकावर तलवार व चाकूने भयानक हल्ला करून त्याची निर्घुनपणे हत्या केली. ही धक्कादायक घटना रात्री आज रात्री 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास उड्डाणपुलाखाली घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

या हल्ल्यात सय्यद इमरान सय्यद शफीक (वय 35, राहणार, सादातनगर, छत्रपती संभाजीनगर) याचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर, मान व शरीराच्या इतर भागांवर वार केले. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्याच्या हाताच्या बोटा कापल्या. एक हाताचा पंजा वेगळा होऊन बाजूला पडलेला आढळला.

प्राथमिक माहितीनुसार, इमरान हे आपल्या रिक्षा (MH-20, EF-9841) वर दोन मुलांना घेऊन घरी जात असताना ही घटना घडली. प्रथम मोटारसायकलवरील युवकांनी त्याला थांबवले, त्यानंतर कारमधून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी कार रिक्षासमोर आडवी लावून इमरानवर तलवार व चाकूंनी सपासप हल्ला केला.

घटनेनंतर सर्व हल्लेखोर फरार झाले.

माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow