पालकमंत्री संजय शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट...

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- अतिवृष्टी आणि जायकवाडी धरणातून झालेला विसर्ग यामुळे पैठण शहरात नदी काठच्या भागात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण झाली. या पूरग्रस्त भागास आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन पाहणी केली.
आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व पोलिस निरीक्षक महादेव गोमारे तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांनी शहरातील सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक इ.ठिकाणांचा समावेश होता.
प्रशासनाने शहरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
श्रीनाथ हायस्कूल इमारत व अभिनंदन मंगल कार्यालयात जाऊन त्यांनी स्थलांतरित नागरीकांची विचारपूस केली. भोजन आणि निवासाबाबत सुचना दिल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करा, असे निर्देश श्री. शिरसाट यांनी केले.
What's Your Reaction?






