मालमत्ता धारकांना दिलासा, फेरफार अदालतीत 668 फेरफार मंजूर...!

मालमत्ता धारकांना दिलासा, फेरफार अदालतीत 668 फेरफार मंजूर
महसूलचा अभिनव उपक्रम...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) च्या अंतर्गत येणारे एकूण 9 मंडळांमध्ये एकाच वेळी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर फेरफार अदालती मध्ये एकूण 668 प्रलंबित फेरफार यांना मंजुरी देण्यात आली व फेरफाराची नक्कल तसेच 7/12 उतारा संबंधित अर्जदारास वितरित करण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्या संदर्भातील एकूण सात प्रकरणांचा निपटारा करून सात रस्ते मोकळे करण्यात आले. फेरफार अदालत मध्ये मंडळातील संबंधित गावांमधील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. त्यावेळी उपस्थित नागरिकांना ॲग्रीस्टॅक योजनेबद्दल माहिती देण्यात आली तसेच ईपीक पाहणी बद्दल जनजागृती करण्यात आली. विविध मंडळातील फेरफार अदालतीस उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार रमेश मुंडलोड तसेच नायब तहसीलदार डॉ. परेश चौधरी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले व उपस्थित नागरिक व खातेदारांशी संवाद साधला असता सदर फेरफार अदालतीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
What's Your Reaction?






