पहिल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सदस्य व विविध समीती सदस्यांची बिनविरोध निवड...
पहील्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्य व विविध समीती सदस्यांची बिनविरोध निवड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभेत महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर राजेंद्र जंजाळ व मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सदस्य व विविध समीती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थायी समितीमध्ये सर्वात जास्त सदस्य आठ भाजपा, शिंदे सेनेचे दोन, एमआयएमचे चार, उबाठाचे एक, वंचित बहुजन आघाडीचे एका सदस्याला स्थान दिले आहे.
भाजपाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे, अनिल मकरिये, सौ.माधुरी अदवंत, सौ.कमलाबाई नरोटे, सुरेंद्र कुलकर्णी, रवि कावडे, अर्चना निळकंठ, अप्पासाहेब हिवाळे, एमआयएमचे नगरसेवक अजहर पठाण, खान अब्दुल मतीन, मेराज खान, श्रीमती खान अल्मास अमजद, शिवसेनेचे नगरसेवक राजू राजपूत, सचिन खैरे, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ यांना सदस्य पद मिळाले आहे.
वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समीती...
भाजपाचे नगरसेवक पद्मसिंग राजपूत, सौ.सुनिता सोळुंके, सौ.कमल थोरात, सौ.सिमा साळवे, एमआयएमचे नगरसेवक मतीन मजीद शेख, श्रीमती जोहरा समिर बीन हैदरा, मोहम्मद वाजिद जागिरदार, शिवसेना नगरसेवक सौ.यशोदा शेळके, शिवसेना उबाठा, अब्दुल रशीद खान मामू यांना या समीतीत सदस्यपद देण्यात आले आहे.
गलिच्छ वस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाज कल्याण समीती...
भाजपाचे नगरसेवक अशोक दामले, जालींदर शेंडगे, सौ.अनिता साळवे, सौ.मिना खरात, एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब काकडे, श्रीमती वाहुळ सुनीता मनोज, श्रीमती साळवे भाग्यश्री संजय, शिवसेनेचे नगरसेवक सौ.छाया वाघचौरे, शिवसेना उबाठा श्रीमती सावित्रीबाई वाणी यांना या समीतीत सदस्यपद म्हणून स्थान मिळाले आहे.
माध्यमिक पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती....
भाजपाचे नगरसेवक सौ.अर्चना चौधरी, सौ.सुमित्रा म्हात्रे, सौ.दया कैलास गायकवाड, नंदलाल गवळी, एमआयएमचे नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कदीर, श्रीमती झीनत युनुस पटेल, मोहम्मद वसीम अहमद, शिवसेना सौ.प्रेमलता दाभाडे, शिवसेना उबाठा श्रीमती सुनिता सोनवणे या नगरसेवकांना या समीतीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
शहर सुधार समिती...
भाजपाचे नगरसेवक रामेश्वर भादवे, सौ.सविता कुलकर्णी, रामदास हरणे, मयुर वंजारी, एमआयएमचे नगरसेवक अली मिर वाजिद, शेख साबेर पाशू, श्रीमती तरन्नूम अकील अहेमद, शिवसेना अभिजित देविदास जोनवाल, शिवसेना उबाठा गणेश लोखंडे यांना या समीतीत सदस्यपद मिळाले आहे.
महिला व बाल कल्याण समिती...
भाजपाचे नगरसेवक श्रीमती पुष्पाताई रोजतकर, श्रीमती शोभाताई बुरांडे, श्रीमती ज्योती गंगवाल, श्रीमती सत्यभामा शिंदे, एमआयएमचे नगरसेवक श्रीमती शेख नर्गिस बेगम सलिम सहारा, श्रीमती विजयश्री आशिष जाधव, श्रीमती नुर जहाँ इक्बाल, शिवसेना श्रीमती अनिता घोडेले, शिवसेना उबाठा श्रीमती वैशाली कोरडे यांना समिती सदस्य पदी निवड कर
ण्यात आली आहे.
What's Your Reaction?