प्रियसीवर गोळीबार करणारा कुख्यात गुंड तेजाची पोलिसांनी काढली धिंड...

 0
प्रियसीवर गोळीबार करणारा कुख्यात गुंड तेजाची पोलिसांनी काढली धिंड...

प्रियसीवर गोळीबार करणारा कुख्यात गुंड तेजाची पोलिसांनी काढली धिंड... 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) -

हर्सुल कारागृहातून नुकताच जामिनावर सुटलेला कुख्यात गुंड सय्यद फैसल उर्फ तेजा, वय 30, राहणार किले अर्क, छ.संभाजीनगर याने प्रियसीवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर इन कॅमेरा मी आणखी दोन-तीन मुलींना मारणार आहे अशी धमकी देखील त्यांने दिली होती. या घटनेत त्याची प्रियसी जखमी झाली होती. हा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला होता. गुंडाची वाढत जाणारी दहशत कमी व्हावी म्हणून शहर पोलिसांनी फैसल उर्फ तेजाची आमखास मैदान ते किलेअर्क पर्यंत धिंड काढली, त्याच्या पायात धिंड काढली तेव्हा चप्पल सुध्दा नव्हती, त्यानंतर त्याची दहशत असलेल्या बुड्डी लाईन, कॅनॉट परिसरामध्ये देखील त्याची धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारांची दहशत कमी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या आरोपीवर एनडिपिएस व अन्य 19 गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याने ती पिस्तोल कोठे ठेवली त्याचा तपास करण्यासाठी त्याला आणले आहे. बंदुक बरामद करायची आहे म्हणून तो बंदुकीचे ठिकाण बदलत आहे. शहर पोलिस अशा प्रकारे शहरात दहशत पसरवणा-यांची दादागिरी सहन करणार नाही. अशी माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow