राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे संजय चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज
राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे संजय चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज...
फुलंब्री, दि. 29(डि-24 न्यूज) राष्ट्रीय जनक्रांती सेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार श्री संजय चव्हाण यांचा फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने नवतरुणांच्या साक्षीने बदल घडवणार व निवडून येणार या ध्येयाने सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज फुलंब्री विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्याप्रसंगी राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये सर्वांनी एकजूटीने प्रचार आणि प्रसार करून राष्ट्रीय जनक्रांती सेनेचे उमेदवार श्री संजय चव्हाण यांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केले यामुळे फुलंब्री विधानसभेमध्ये आता तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून संजय चव्हाण हे कुणाची विकेट घेता की निवडून येता हे बघावं लागेल.
What's Your Reaction?