गुलमंडी परिसरातील अतिक्रमणे निष्कासित...!
गुलमंडी परिसरातील अतिक्रमणे निष्कासित...
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज गुलमंडी परिसरातील 35 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.
मा.प्रशासक जी श्रीकांत यांनी आज सकाळी आठ वाजता औरंगपुरा महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते गुलमंडी व गुलमंडी पासून दिवाण देवडी व कुंभार वाडा रंगार गल्ली या भागाची पाहणी केली. त्यांनी सर्वप्रथम रस्ता बाधीत व रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण बाबतची चर्चा केली व रस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबत लगेच आदेशित केले. या अनुषंगाने मा.अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार गुलमंडी येथील द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्या लगत असलेल्या लोखंडी टपऱ्या व हातगाड्या यांचे अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमणधारकांनी बऱ्याच दिवसापासून ठाण मांडून या ठिकाणी अतिक्रमण केले होते. आज सकाळी प्रथम त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यानंतर कुंभार वाडा या रस्त्यावरील रस्ता बाधित शेड, पायऱ्या ,लोखंडी पायऱ्या व लहान जीने निष्कासित करण्यात आले. यानंतर गायत्री चाट भांडार यांचे समोरील रस्त्यावरील रस्त्यावर आलेले दुकानाचे कक्ष बांधकाम निष्कर्षित करण्यात आले व उर्वरित सहा ते आठ दुकानदार यांनी वेळ मागून घेतल्याने त्यांना वेळ देण्यात आली आहे. यांच्यावर उद्या सकाळी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. यानंतर या पथका द्वारे पोलीस स्टेशन व मछली खडक या रस्त्यावर एकूण चार व्यापाराविरुद्ध कारवाई करून त्यांचे किरकोळ प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले. नंतर वसंत भवन इमारत या ठिकाणी तीन लोकांनी टपऱ्या दोन हात गाड्या व इतर प्रकारचे अतिक्रमण केले होते हे पूर्णपणे जमीन दोस्त करण्यात आले .यांनतर केळी बाजार येथे रस्ता बाधित एकूण दहा व्यापाराविरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये काही व्यापाऱ्यांचे किरकोळ साहित्यही जप्त करण्यात आले. यापुढे या रस्त्यावर नेहमीच याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. आजच्या कारवाईत बाबत गुलमंडी परिसरातील व्यापाऱ्यांनी महापालिकेचे अभिनंदन केले व कारवाईत असेच सातत्य ठेवण्याची विनंती केली. तसेच रस्त्यावर आलेले अतिक्रमण त्वरित काढा व इतर अतिक्रमण काढणे बाबत त्यांनी मनपाला सूचना दिल्या. या ठिकाणी दोन-तीन नागरिकांनी मान्य आयुक्त यांना भेटून रस्ता रुंदीकरण ची मोहीम घ्यावी अशी विनंती केली याबाबत आयुक्त लवकरच या भागातील नागरिकांची बैठक घेणार आहेत यानंतर त्या रस्त्याचे रस्ता रुंदीकरण करण्याबाबत पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. आज झालेल्या कारवाई मध्ये चार हातगाड्या, लोखंडी टपऱ्या व किरकोळ सामान जप्त करण्यात आले आहे .सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक श्री जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी ,उपायुक्त अतिक्रमण विभाग मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे,इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, सय्यद युनूस ,अतिक्रमण विभाग मजूर व विद्युत विभाग कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?