सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्यास माफी देवू नका, मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा ठराव...

अवमान करणा-यास माफी देऊ नये... !
मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा ठराव व सरन्यायाधीशांना पत्र !
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 7(डि-24 न्यूज)-सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरील हल्ला हा वैयक्तिक विषय नसून तो संविधानावरील हल्ला असल्याने त्याबाबत माफी न देता कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करणारे पत्रही पाठवण्यात आले आहे. असोसिएशनच्या जुने उच्च न्यायालय ईमारत, औरंगाबादच्या कार्यालयात झालेल्या निषेध सभेत दिनांक : 6/10/2025 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात राकेश किशोर तिवारी या व्यक्तीने सन्माननीय सरन्यायाधीश यांचा केलेल्या अवमानाचा तिव्र निषेध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, सदर ठरावात सरन्यायाधीशांना विनंती करण्याचेही निर्णय घेण्यात आला की, सदर प्रकरणी रितसर तक्रार नोंदवुन सबंधीतास कठोर शिक्षा करण्या बाबतची कारवाई करावी.
सदर हल्ला हा केवळ सरन्यायाधीशांवरील नसुन हा संविधानावरील हल्ला आहे असे मत सदर निषेध सभेत उपस्थीत असणा-या विधिज्ञांनी व्यक्त केले. त्याच बरोबर सदर हल्ला हा पूर्व नियोजीत, संपूर्णपणे शुध्दिवर व अभियांत्रिकी पध्दतीने ठरवून केलेला हल्ला आहे, सदर हल्लेखोराचा उद्देश व वर्तन हा धाक बसविणे, वचक बसविणे, दहशत निर्माण करणे, आघात करणे, नियंत्रीत करणे, अटी शर्ती लादने इत्यादी प्रकारचा आहे. सदर हल्लेखोराचे हल्ला करण्यापूर्वीचे व हल्ला केल्यानंतरचे वर्तन पाहता, त्या बाबत त्यास कुठलाही खेद अथवा पश्चाताप नाही हे दिसुन येत आहे. उलट न्यायालयात आक्षेपार्ह घोषणा देणे, त्यानंतर प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत पुन्हा सन्माननीय सरन्यायाधीश न्यायमुर्ती भुषण गवई यांच्या बदल पुन्हा आक्षेपार्ह बोलणे, या सर्व गैरवर्तनाची, लज्जास्पद वर्तनाची तसेच सदर हल्लेखोरास अशा प्रकारचा हल्ला करण्यास प्रवृत्त करणा-या शक्तींची देखील चौकशी होऊन सदर हल्लेखोरास व त्यास मदत करणा-यांना प्रचलीत कायदयाप्रमाणे कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, असे मत असोसिएशनने आयोजीत केलेल्या निषेध सभेत उपस्थीत विधीज्ञांनी व्यक्त केले व ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सदर ठराव आपणास रितसर कळवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अत्युच्च सन्मान करतो याच भावनेने सदर ठराव आपणास कळवित आहोत व आपण आमच्या संवैधानिक अपेक्षांचा गांभिर्यपूर्वक विचार करून सदर हल्लेखोरास प्रचलित कायदयाप्रमाणे कठोर शिक्षा दयावी ही नम्र विनंती ही करण्यात आली आहे. सदर निषेध सभा असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. अनिल सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी असोसिएशनचे सेक्रेटरी अँड . अभय टाकसाळ, ज्येष्ठ विधीज्ञ अँड. जनार्दन भोवते, अँड . सागरदास मोरे, अँड. बाबासाहेब वावळकर , अँड. सचिन गंडले , व्ही डी रामटेके, अँड. आर आर बरडे, अँड. आनंदा वाकोडे, अँड. उमेश इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने वकील मंडळी उपस्थित होते.
What's Your Reaction?






