भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न, शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात - मंत्री अतुल सावे

 0
भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न, शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात - मंत्री अतुल सावे

भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न, शिवसेना - भाजपा युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात - मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून व त्यांच्या कवितांचे वाचन करून आज सकाळी तापडिया कासलीवाल मैदान, जिल्हा न्यायालयासमोर भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे मंत्री अतुल सावे व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला. 750 कोटी रस्त्यांसाठी निधी मिळाला. पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन पाण्याच्या पाइपलाइन टाकण्यासाठी त्यावेळी 1680 कोटींचा निधी मंजूर केला. माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने आणखी निधी दिला आता हि योजना विलंबामुळे 2700 कोटींपर्यंत गेली आहे. महाविकास आघाडी सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला नसल्याने काम रखडले होते. आता जलदगतीने काम चालू आहे. लवकरच पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. डिएमआयसित नवीन उद्योग आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करार केले. इंटरनॅशनल कंपन्या येत आहे त्यामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. शहराच्या विकासासाठी शिवसेना व भाजप युतीची सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत तोडगा निघणार आहे. जागावाटपाबाबत बैठका शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुरू आहे. इच्छूकांची संख्या जास्त आहे. सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य होणार नाही तरीही कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. उमेदवारीचा निर्णय अंतिम वरिष्ठ नेत्यांचा असतो. संघटनेत काम करने पण महत्वाचे आहे तेच काम करत आम्ही येथपर्यंत आलो आहे. भाजपात अनुशासन आहे. शिस्त आहे. सर्व इच्छूक एकत्र फिरत प्रभागात जावून जनतेच्या भेटीगाठी घेत आहे हे फक्त भाजपात घडत आहे. पक्षाला विजय मिळवून देणे हि प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जवाबदारी आहे. कमळ हाच आपला उमेदवार समजून कामाला लागावे. तिकीट मिळाले नाही तर नाराज होऊ नका. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक शासकीय कमिट्या आहे तेथे आणि संघटनात्मक कामामध्ये सामावून घेवू. नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करुन भाजपाचा महापौर बणवायचा आहे. असे सावेंनी आपल्या भाषणात सांगितले.

शहरात भाजपाचे चार नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर आठ आणि गेल्या निवडणुकीत अपक्ष मिळून भाजपाकडे 29 नगरसेवक झाले होते. संघटनात्मक ताकदीमुळे हे घडले. शहरात युतीमध्ये महापौर, उपमहापौर, विविध समीत्यांवर काम करण्याची संधी भाजपाच्या नगरसेवकांना मिळाली. युतीमध्ये कोणाला तिकीट मिळेल कोणाला मिळणार नाही बंडखोरीचा प्रयत्न करु नका. पक्ष आदेश कार्यकर्त्यांनी पाळलाच पाहिजे. आपली केंद्र व राज्यात सत्ता आहे कोठे ना कोठे प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्ष देईल असा विश्वास ठेवावा. शहराच्या विकासासाठी युतीचा महापौर निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम सर्वांना घ्यावे लागतील. 

आमचा मुकाबला एमआयएमशी आहे. निजामाच्या एमआयएमला या निवडणुकीत गाडले पाहिजे. रजा खान नावाच्या अधिका-याने शहर विकास आराखडा तयार केला यामध्ये हिंदू पौराणिक मंदीरे रस्त्यात बाधित होतील असा बणवला ते धार्मिक स्थळ आपल्याला वाचवावे लागतील. या आराखड्यातील त्रुटी दूर करावे लागतील. विरोधकांना महापालिका निवडणुकीत धडा शिकवा. शहराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे. महापौर युतीचा झाला तर विकासाला अधिक चालना मिळेल. 33 वर्षाच्या राजकीय प्रवासानंतर मेहनतीचे फळ मिळाले म्हणून आमदार झालो. अनेक पदांवर संघटनात्मक काम केले. भाजपात काम करणाऱ्यासोबत न्याय केला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याला प्रगतीपथावर नेत आहेत ते कॅप्टन आहे आणि कमळ हे पिच आहे. चौके आणि सिक्स मारुन विजय मिळवून द्यायचा आहे हि आपली जवाबदारी आहे प्रत्येक मतदारांपर्यंत जायचे आहे. शहरातील अवैध कत्तलखाने महापालिकेत आल्यानंतर बंद करु असा इशारा आमदार संजय केनेकर यांनी दिला.

प्रस्तावना शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली. तर फुलंब्रीचे आमदार अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडामोडे यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी व्यासपीठावर निवडणूक समीतीचे समीर राजूरकर, बसवराज मंगरुळे,  राजु वैद्य, राजगौरव वानखेडे, किरण पाटील, प्रशांत देसरडा, शालिनीताई बुंदेले, अनिल मकरीये, लता दलाल, कचरु वैराळकर, एड माधुरी अदवंत, प्रमोद राठोड, अब्दुल हाफिज, शेख सलिम

व माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow