जल्लोषात व शक्ती प्रदर्शन करत किरण पाटील डोणगावकरांचा पदग्रहण

 0
जल्लोषात व शक्ती प्रदर्शन करत किरण पाटील डोणगावकरांचा पदग्रहण

जल्लोषात व शक्ती प्रदर्शन करत किरण पाटील डोणगावकरांचा पदग्रहण...

एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारीणीत 16 नेत्यांचा गांधी भवनात गांधी टोपी घालून सत्कार...गांधी भवन भरले खचाखच

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - आज गांधी भवन येथे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात खचाखच भरले. मोठ्या संख्येने शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात व शक्ती प्रदर्शन करत किरण पाटील डोणगावकर यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. मावळते जिल्हाध्यक्ष तथा जालन्याचे खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची इतिवृत्त बुक सुपुर्द करुन सत्कार करत जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार सोपविला. यावेळी पक्ष संघटना ग्रामीण भागात मजबुत करणे, काही दिवसांत नवीन कार्यकारीणी घोषित करणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून करणार. पक्षाने एवढी मोठी जवाबदारी दिल्याने पक्ष श्रेष्ठिंचे डोणगावकरांनी आभार मानले. एनएसयुआयचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व महाराष्ट्र प्रदेश जंबो कार्यकारीणीत 16 नेत्यांना स्थान दिले यांचा सत्कार कार्यक्रम शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमात सर्वांना गांधी टोपी घालून शाल व हार घालून जंगी स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ.कल्याण काळे उपस्थित होते.

यानंतर डाॅ.कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सरकारवर टिका केली. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहे. जिल्ह्यात खतांची टंचाई आहे. पिक विमा मिळत नाही. शेतक-यांना सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले ते आश्वासन पुर्ण केले नाही. शहरात अतिक्रमण व रस्ता रुंदीकरणात गरीबांचे घरे पाडली जात आहे. शहराचा पाणी प्रश्न अजून सुटलेला नाही शहरवासियांना भरपुर पाणी कधी मिळणार याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरुन आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. सिंदूर ऑपरेशन व शेजारच्या देशासोबत केलेल्या सिजफायरवर पंतप्रधान बोलायला तयार नाही. सिजफायर डोनाल्ड ट्रंप यांनी करण्याची घोषणा केली की भारत सरकारने देशाला उत्तर द्यावे. सिंधू नदी करारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह चुकीचा इतिहास संसदेत सांगत आहे हे देशाचे दुर्देव आहे असे म्हणत काळेंनी सरकारवर हल्लाबोल केला. या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल पटेल, प्रदेश कार्यकारीणी सदस्य विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष एम.एम.शेख, प्रदेश उपाध्यक्ष कमाल फारुकी, प्रदेश सरचिटणिस जितेंद्र देहाडे, प्रदेश सरचिटणिस मोहन देशमुख, प्रदेश सरचिटणिस लहुजी साळवे, प्रदेश सरचिणिस संदीप ढवळे पाटील, प्रदेश सचिव डाॅ.सरताज पठाण, प्रदेश सचिव एड सय्यद अक्रम, प्रदेश सचिव रविंद्र काळे, प्रदेश सचिव अविनाश डोळस आदी उपस्थित होते‌. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow