शहागंज ते सिटी चौक रस्त्यावरील हाॅकर्सवर कारवाई सुरू, उद्यापासून रस्त्यावर हातगाडीवर व्यवसाय केला तर सामान जप्त होणार...
शहागंज ते सिटी चौक पथविक्रेत्यांना सामान जप्तीचा इशारा, विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - दरवर्षी पवित्र रमजान महिन्यामध्ये ईदच्या खरेदीसाठी हातगाडीवर किरकोळ विक्रेते आपला व्यवसाय 20 रोजे झाल्यानंतर करत होते परंतु यंदा शहागंज व सिटी चौक येथे व्यवसाय करता येणार नाही यामुळे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे अशी चर्चा आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यवाही सुरू असताना व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती. रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण होतो यामुळे वाद विवाद होतात हे टाळण्यासाठी मनपा प्रशासन व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. आज महापालिकेच्या वाहनातून हाॅकर्स व्यापा-यांना इशारा दिला कि उद्यापासून रस्त्यावर हातगाडी, टेबल, काऊंटर व विक्रीचे साहित्य आढळल्यास जप्त करण्यात येईल ते परत मिळणार नाही. कारवाईच्या धास्तीने हाॅकर्स गल्ली बोळात आपली हातगाडी घेऊन परत निघत होते. आता विक्रीचा माल त्यांना हाॅकर्स झोन बनत नाही तोपर्यंत गल्ली बोळात फिरुन विक्री करावा लागेल अशी परिस्थिती आहे.
महापालिकेच्या पथकाने रस्त्यावर, दुकानाबाहेर लावलेले काऊंटर, सामान काढून घ्यावे, शटरच्या आतमध्येच सामान लावा, वाहतूकीला अडथळा करु नका, आज समजावून सांगत आहेत उद्या कार्यवाही करु, जप्त केलेला माल परत मिळणार नाही असा इशारा सायंकाळी मनपाच्या अतिक्रमण विभागाने विक्रेत्यांना दिला आहे. पथक प्रमुख संजय सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहागंज, गांधी पुतळा ते सिटी चौक रस्त्यावरील दुकानदार विक्रेत्यांना माईक वरुन सूचना दिल्या. बेशिस्त हातगाड्यामुळे ईदनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना कुटुंबासह कोणत्याही प्रकारचा रहदारीला त्रास न होता खरेदी करता यावी यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. शहरात काही महीन्यात हाॅकर्स झोन बनवले जातील यामुळे विक्रेत्यांना सुद्धा सुविधा मिळणार आहे. ग्राहकांना पायी रस्ता चालता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू आहे. उद्यापासून रस्त्यावर हाॅकर्स व्यवसाय करताना आढळल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा सुरडकर यांनी दिला आहे
.
What's Your Reaction?