व्हाईस ऑफ मीडियाच्या दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन...
व्हॉईस ऑफ मीडियाच्या दिनदर्शिकेचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते प्रकाशन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय संघटना Voice of Media यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या नववर्ष दिनदर्शिकेचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अब्दुल कय्यूम, प्रदेश अध्यक्ष (व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग), यांनी संघटनेच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि समाजातील सकारात्मक कार्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रकाशन कार्यक्रमात डॉ. दुसाने यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचे कौतुक करत पत्रकारांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडताना जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन केले. माहिती व जनसंपर्क विभाग आणि पत्रकार यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास डॉ. शकील शेख, अलीम बेग, संजय हिंगोलीकर, रमेश जाबा, बबन सोनवणे, अनिस रामपुरे, हसन शाह, एम ए शकील,सुजित ताजने, सय्यद मुख्तार, रशीद शाह, मिर्झा शफीक बेग, सय्यद शब्बीर, फिरोज खान, जगदीश पाठक, प्रवीण बोर्डे, यश सोनवणे, दिनेश परदेशी, गजानन बोधडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्हॉईस ऑफ मीडियाच्या या उपक्रमामुळे पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातही अशाच विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
What's Your Reaction?