मंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार - करुणा मुंडे

 0
मंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार - करुणा मुंडे

मंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार - करुणा मुंडे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) - राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांचा वाद विकोपाला गेला आहे. मंत्री बनण्याचे स्वप्न बघणारे धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार असा मोठा दावा छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीत धनंजय मुंडे यांची आमदारकी शंभर टक्के रद्द होणार असून याप्रकरणी पुढील सुनावणी 6 मार्च रोजी न्यायालयात होणार आहे. न्यायालयाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठात सुनावणी झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होत्या.

करुणा मुंडे यांनी त्यांच्या विरोधात दोन ठिकाणी कायदेशीर लढा पुकारला आहे. आमची अर्धी केस पूर्ण झाली असून पुढील तारखेपासून मुख्य सुनावणीला सुरुवात होईल. हायकोर्टाने आम्हाला सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले आहे तर दुसरीकडे परळीत आमचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर आम्ही अंबेजोगाई न्यायालयात अपील केली तेथेही धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली आहे. आम्हाला दोन्ही ठिकाणी यश मिळेल असा विश्वास करुणा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow