विमानतळासमोरील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त...!

विमानतळा समोरील अनाधिकृत बांधकामे जमीन दोस्त...
औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी विमानतळा समोरील न्यू हायस्कूल लगत असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबीने कारवाई करून दुकानांचे अतिक्रमणे जमीदोस्त करण्यात आले.
सदर ठिकाणी मुख्य हायवे रस्त्यालगत व शाळेच्या कंपाउंड वॉल मधील गट न 706 ची खुली जागा आहे. संबधित जागा मालकांनी सुरुवातीला त्यांच्या कंपाउंड व शाळेच्या व त्यांच्या मधल्या जागेत 30 बाय 20 या दोन दुकाने तीन शटर पत्र्याचे बांधकाम करून त्याला प्रथम दर्शनी भागात शटर लावण्यात आले. या कामाबाबत न्यू हायस्कूल चिकलठाणा शाळेचे प्रशासकीय अधिकारी यांनी हरकत घेऊन लेखी तक्रार दिली होती. त्याच वेळी संबंधिताला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम करू नये टपरी शेड टाकू नये अशी सक्त ताकीद देऊन थांबविण्यात आले होते.
परंतु संबधित जागा मालक ही जागा माझ्या मालकीची आहे माझ्याकडे सातबारा आहे असे करून पुन्हा बांधकाम करून नियमांचे उल्लंघन करत होते. संबंधिताला महानगरपालिकेतर्फे नोटीस देण्यात आली होती. त्यांनी सादर केलेल्या खुलासामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे आढळून आले. त्याला सदर बांधकाम स्वतःहून काढून घ्या म्हणून वेळोवेळी सूचनाही दिल्या परंतु संबंधिताने सूचनांचे पालन केले नाही उलट त्या ठिकाणी अजून पन्नास बाय तीस या आकाराचे तीन दुकाने काढून त्याची उंची सुमारे वीस फूट वर घेतली. त्यामुळे शाळेलगत असलेल्या जाहिरात बोर्ड वरील जाहिरात दिसण्यास अडथळा निर्माण होत होता. याबाबत शाळेने पाठपुरावा केला यावेळी सुद्धा संबंधितास सांगण्यात आले की स्वतःहून काढून घे परंतु त्यांनी न काढल्याने सदर तीन दुकाने उरलेली सुरुवातीचे दोन दुकाने व सिमेंटचे पोल व बाजूलाच पुन्हा पंधरा बाय दहा या आकारात फळ खाद्यपदार्थ विक्रेत्याला भाड्याने दिली होती ते पण शेड जमीनदोस्त करण्यात आले. याबाबत संबंधिता विरुद्ध शनिवारी कारवाई करण्यासाठी पथक गेले असता संबंधित मालक व त्याचे नातेवाईक व कार्यकर्ते यांनी पथकाला विरोध केला व मुदत मागून घेतली. आणि तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून कारवाई करत आहात तुम्ही जाहिरात बोर्ड वाल्या करून करत आहे शाळेला तुम्ही घाबरत आहे आमदारांना घाबरत आहे असा आरोप केला व मालकाने सुद्धा मी माझे बांधकाम काढून घेतो असं तोंडी आश्वासन देऊन वेळ मागून घेतली. परंतु त्यांनी अतिक्रमण न काढल्याने आज सकाळी महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. संबंधिताने सुरुवातीला कारवाईला विरोध केला नंतर त्याने त्या ठिकाणाहून परत गेले परंतु काही कार्यकर्ते याला विरोधच करत होते मात्र उपायुक्त मंगेश देवरे आणि सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना वेळोवेळी त्यांनी केलेले प्रश्नाचे उत्तर देऊन सदर कारवाई कोणाच्याही दबावाला बळी न पडता आयुक्त यांच्या आदेशानुसार मान्यतेनुसार होत आहे असे त्यांना समजावून सांगितले आणि कारवाई पूर्ण केली.
सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त अतिक्रमण विभाग मंगेश देवरे ,सहाय्यक आयुक्त तथा पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशीद, सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह मनपा पथकातील मजूर सरकार कर्मचारी यांनी पार पाडली. सदर ठिकाणी शेडचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
What's Your Reaction?






