ओला दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी केले मौन सत्याग्रह

 0
ओला दुष्काळ व कर्जमाफी जाहीर करण्याच्या मागणीसाठी गांधी पुतळ्याच्या पायथ्याशी केले मौन सत्याग्रह

ओला दुष्काळ व संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी म्हणून गांधी पुतळ्याचे पायथ्याशी मौन सत्याग्रह...

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती घोषित करावी म्हणून आज गांधी जयंतीच्या दिवशी, शहागंज येथील गांधी पुतळ्याचे पायथ्याशी मौन सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते.

संविधान बचाव देश बचाव अभियान भारत जोडो अभियान, जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन - महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, समाजवादी जन परिषद, श्रमिक मुक्ती दल इ. संघटनांचे वतीने शहागंज येथील गांधी पुतळा येथे हा सत्याग्रह करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी व ग्रामीण कष्टकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे . राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून, युद्ध पातळीवर आर्थिक मदत केली पाहिजे, करिता शेतकऱ्यांना तातडीने एकरी 50 हजार रूपये व शेतमजुरांना 25 हजार रुपये, त्यांचे बँक खात्यात तात्काळ वर्ग करावेत , सदरील नुकसानभरपाई सरकारी व गायरान जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीनांना ही देण्यात यावी, विद्यार्थ्यांची परिक्षा सह सर्व फीस माफ करावी इ. मागण्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

तसेच कामगार - कर्मचारी व नागरिकांनी आपले कर्तव्य मानून, कामाच्या ठिकाणी मदत फेरी काढून, जमा रक्कम सरकारकडे जमा करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

गांधी जयंती, 2ऑक्टोबर रोजी सकाळी शहागंज येथील, गांधी पुतळ्यास अभिवादन करून मौन सत्याग्रहात सुरुवात करण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, ग्रामीण कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मदत फेऱ्या काढाव्यात अशा सूचना आल्या.

 या मौन सत्याग्रहात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, महाराष्ट्र गांधी निधीचे संचालक प्रा. मच्छिंद्र गोरडे, संविधान बचाव देश बचाव अभियानचे प्रा. श्रीराम जाधव, प्रा. गीता कोल्हटकर, समाजवादी जन परिषद चे एड.विष्णू ढोबळे, स्वराज अभियानचे शेख खुर्रम, मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस एड. सुभाष सावंगीकर, देविदास किर्तीशाही, साथी जगन भोजने, प्रा. एच. एम. देसरडा, शकुंतला देसरडा, स्वराज अभियानचे साथी शेख खुर्रम, श्रमिक मुक्ती दलाचे सुभेदार मेजर सुखदेव बन, ज्येष्ठ गांधीवादी ज्ञानप्रकाश मोदानी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे ख्वाजा शरफोद्दीन, एड.लक्ष्मण प्रधान, एड.सेवकचंद बाखरिया, अड.राजेश शाह, आम आदमी पार्टीचे पाशा खान इ. चा सक्रिय सहभाग होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow