महाराष्ट्रात सुरू होणार नाईट लाईफ, 24 तास राज्यातील दुकाने उघडी ठेवण्याचा जीआर...

महाराष्ट्रात सुरू होणार नाईट लाईफ, 24 तास राज्यस्तरीय दुकाने उघडी ठेवण्याचा जीआर...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज), दि.1(डि-24 न्यूज)-
महाराष्ट्र राज्यातील सर्व दुकाने व आस्थापना 24 तास सुरू ठेवण्यासाठी उद्योग मंत्रालयाने आज आदेश काढले आहेत. उद्योग धंदे वाढावे या उद्देशाने हे आदेश काढले. यामुळे आता राज्यात लाईफ सुरू होणार. अशी चर्चा सुरू झाली आहे.
आदेशात म्हटले आहे सर्व दुकाने, निवासी हाॅटेल, उपहारगृह, खाद्य गृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणूकीच्या जागा 24 तास सुरू ठेवण्यासाठी मुभा असणार आहे.
परंतु मद्यपान गृहे, बार परमिट रुम, हुक्का पार्लर, देशी बार यांना निर्धारित वेळेत आपले व्यवसाय बंद करावे लागतील.
आस्थापना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली तरीही कर्मचाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण अटी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे) अधिनियम, 2017 च्या कलम 11 नुसार, राज्य सरकारला विविध आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवता येईल. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एकदा सलग 24 तास साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे.
सरकारने 19 डिसेंबर 2017 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, मद्य विक्री यांच्या वेळा निश्चित केले आहे यामधून 31 जुलै 2019 पासून थिएटर, सिनेमिगृह यांना वगळण्यात आले आहे.
What's Your Reaction?






