सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी अक्रामक, संसदेत निदर्शने

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी आक्रमक, संसदेत निदर्शने
नवी दिल्ली, दि.11(डि-24 न्यूज) महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडले आहेत. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू असली तरी, अनेक शेतकऱ्यांचा अद्यापही सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून, खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या खासदारांनी सोमवारी संसदभवन परिसरात निदर्शने करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, बळवंत वानखेडे आणि शिवाजी काळगे यांनी सहभाग घेतला.
खासदारांनी सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
What's Your Reaction?






