अभिनेता राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी...!

 0
अभिनेता राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी...!

अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करणे बाबत व चैतन्य तुपे यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जे तात्पर्य दाखवले म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांचा काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक व एकेरी भाषेचा उल्लेख करून तमाम भारतीय आंबेडकरी जनतेचा अपमान केला म्हणून असे व्यक्ती महापुरुषांचा वारंवार अपमान करतात म्हणून यांच्यावर कुठेतरी लगाम लागावा म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आले की अशा व्यक्तीवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी नसता राहुल सोलापूरकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने निवेदनात दिला आहे. तसेच चैतन्य तुपे या लहान मुलाला गुंडांनी अपहरण केले होते पोलिसांनी दिवस-रात्र एक करून चैतन्य तुपेला शोधले व अपहरण करणाऱ्या गुंडांना बेड्या घातल्या म्हणून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा सत्कार केला. तसेच जटवाडा रोड सईदा कॉलनी लहान मुलं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली म्हणून पोलीस आयुक्त तसेच क्राईम ब्रांच डीसीपी शीलवंत नांदेडकर यांचे कौतुक करून काँग्रेस तर्फे त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. शहरांमध्ये जे अवैध धंदे चालू आहेत गांजा विक्री, गुटखा विक्री पतंगचा मांजा विक्री याच्यावरही प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी असेही निवेदन देण्यात आले. तसेच दोन चाकी व चार चाकी सिटी चौक पोलीस स्टेशन पासून ते शहागंज पर्यंत रॉंग साईड्स गाड्या चालवतात त्यांच्या कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच दोन चाकी बुलेट हे सायलेंट झोन मध्ये सुद्धा मोठमोठ्याने कर्कश आवाज करून शाळकरी मुलांना रुग्णांना त्रास देतात कठोर कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन सुद्धा पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. टीव्ही सेंटर येथे महापुरुषांच्या बॅनरची विटंबना करण्यात आली त्या समाजकंटकावर सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्यात यावी हे निवेदन शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस अनिस पटेल, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष डॉ. अरुण शिरसाठ, शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखाताई राऊत, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आकेफ रजवी, काँग्रेस परिवहन विभागाचे अध्यक्ष असमत खान, असंघटित कामगारचे अध्यक्ष चंद्रप्रभाताई खंदारे, विद्याताई घोरपडे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव शिरीष चव्हाण, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सय्यद युनूस, रवी लोखंडे, प्रा शीलवंत गोपनारायण, मजाज खान, शेख अझहर, रंजनाताई साबळे, सलीम पटेल, आनंद दाभाडे, डॉ. गौतम शिरसाट, अजमल सिद्दिकी, राहूल पाटील, गंगाधर आरक आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow