जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन...!

 0
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन...!

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन...! 

- एमजीम विद्यापीठ, कलर्स ऑफ संभाजीनगर आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचा उपक्रम

- कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये रविवारी उद्घाटन

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) यशवंतराव सेंटर मुंबई विभागीय कार्यालय आणि एमजीएम विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलर्स ऑफ संभाजीनगर ह्या हौशी फोटोग्राफर समूहातर्फे 19 ऑगस्ट या जागतिक छायाचित्रण दिवसाचे औचित्य साधून वन्यजीव, निसर्ग, उत्सव, वारसास्थळे, पोर्ट्रेट आणि लोकसंस्कृती ह्या विषयांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. दिनांक 20 ऑगस्ट (रविवार) ते 21 ऑगस्ट (सोमवार) या दिवशी सकाळी 10 ते रात्रौ 8 या वेळेत एमजीएमच्या कला दीर्घा आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.

शहरातील 60 व शहराबाहेरील 20 हौशी फोटोग्राफर लोकांचे 100+ फोटो रसिकांना बघण्यास मिळतील. प्रदर्शनाचे उद्घाटन दि.20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता होईल त्यानंतर हे प्रदर्शन सर्वांना बघण्यास खुले असेल. रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow