श्वान परवाना काढून घ्या अन्यथा श्वान जप्त होणार..मनपाचे फर्मान
श्वान परवाना काढून घ्या अन्यथा श्वान जप्त होणार...
विना परवाना श्वान बाळगणाऱ्या वरती आता दंडात्मक कारवाई...
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व श्वान मालकांना कळविण्यात येते की, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, अधिनियम १९४९ चे कलम १२७(२), (क) ४५७, (१३) अन्वये महानगरपालिका हद्दित पाळीव श्वान बाळगण्यासाठी श्वान परवाना हस्तगत करणे बंधनकारक आहे. तरी सर्व संबधीतांनी तात्काळ महानगरपालिका पशुचिकीत्सालय बायजीपुरा येथुन (सुट्टीचे दिवस सोडून) श्वान परवानासाठी लागणारे कागदपत्रे सादर करून नवीन श्वान परवाना व नुतनीकरण करून श्वान परवाना हस्तगत करावा.
तसेच पाळीव श्वान महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय अनाधिकृत पाळले असे गृहीत धरून विषेश मोहिमे अंतर्गत पाळीव श्वान नियम (११) अन्वये जप्त करण्यात येईल. विनापरवाना श्वान बाळगल्याचे दंड व परवाना शुल्क वसूल करण्यात येईल. याची सर्व श्वान मालकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
श्वान परवाना घेण्याबाबत आवश्यक बाबी
श्वान परवाना नमुना अर्ज. पाळीव प्राण्यांचे दोन रंगीत फोटो ( साईज ५ x ७ से.मी. ). श्वान दंशक प्रतिबंधक रेबीज लस प्रमाणपत्र महानगरपालिका.
श्वान परवाना फी रु. ७५०/-
श्वान परवाना नुतनीकरण फी ७५०/-
श्वान परवाना मिळण्याचे ठिकाण
. म.न.पा पशुचिकीत्सालय बायजीपुरा.सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 8 ते 1व दुपारी 3 ते 5 वाजे पर्यंत.
अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9421664514 व दुरध्वनी क्रमांक 02402301354 डॉग युनिट, बायजीपूरा येथे संपर्क साधावा असे प्र. पशु वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका यांनी कळविले आहे.
What's Your Reaction?