एका लाखावरील 4 थकीत मालमत्ता धारकांचे नळ तोडले

एक लाखावरील 4 थकीत मालमत्ता धारकांचे नळ तोडले
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नारळी बाग येथील एक लाखा वरील थकीत 4 मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम सातत्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार झोन निहाय एक लाखा वरील थकीत मालमत्ता धारकांना वेळोवेळी मालमत्ता कर भरणे करिता आवाहन करण्यात आले आहे. तरी सुध्दा मोठ्या संख्येने मालमत्ता धारकांनी अद्याप ही आपल्या कडील एक लाखावरील थकीत मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यामुळे आयुक्त यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता अशा मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार आहेत.
आज झोन क्रं.1 अंतर्गत वार्ड न.52 नारळी बाग येथे सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख वरील 4 थकबाकी दारांचे नळ खंडित करण्यात आले. या पुढे ही सदर कारवाई अशीच सुरू राहणार असून मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कर भरून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर कारवाई कर अधीक्षक, अविनाश मद्दी, लिपिक अशोक वाघमारे ,वसुली कर्मचारी राहुल बनकर ,हमीदमामु यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






