वंचितची पहीली यादी प्रसिद्ध, प्रभाग 9 मधून 4 उमेदवार मैदानात...
वंचितची पहीली यादी जाहीर, प्रभाग 9 मधून 4 उमेदवार मैदानात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - नारेगाव-मिसारवाडी प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेस सोबत आघाडी होईल का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओबीसी महीला (ब) आरक्षित जागेसाठी शबनम कलिम कुरेशी, सर्वसाधारण (ड) मधून कलिम छोटु कुरेशी, सर्वसाधारण महिला(क) मधून शहनाज सलिम पटेल, एससी(अ) मधून सतीश दामू पट्टेकर यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी हि यादी जाहीर केली आहे.
What's Your Reaction?