अजित पवार गटाचे स्वबळावर 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 18 उमेदवारांची पहिली यादी जाहीर...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - राष्ट्रवादी अजित पवार गट छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढत आहे. महायुतीत शिंदे सेना व भाजपाच्या युतीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही सात जागेवर आत्तापर्यंत सहमती झालेली नाही. अजित पवार गटाने आज 18 उमेदवारांची यादी शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी जाहीर केली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून डाॅ. चारुलता सुनील मगरे, प्रभाग 6 मधून अजिज खान गणी खान, प्रभाग 7 मधून तुषार रामचंद्र सुराशे, प्रभाग 8 मधून हेमंत गोविंदराव देशमुख, प्रभाग 9 अब्बास मैदू शेख, विशाल ओमप्रकाश इंगळे, फरहीन अफसर पठाण, प्रभाग 16 मधून डाॅ.मयूर मोहनराव सोनवणे, सौ.विशाखा अनिकेत निरावार, मोहम्मद इसा मोहम्मद शरीफ कुरेशी, प्रभाग 17 उल्हास वसंतराव नरवडे, प्रभाग 21 अंकिता अनिल विधाते, प्रभाग 22 मोरे ज्योती राजाराम, सुदाम धोंडीबा साळुंके, विशाल बाबासाहेब पुंड, प्रभाग 23 दत्तात्रय सुंदरराव भांगे, प्रभाग 26 फिरोज पटेल, प्रभाग 28 पल्लवी उत्कर्ष पल्हाळ यांना उमेदवारी दिली आहे.
What's Your Reaction?