कर्तव्यपूर्तीचा सन्मान, ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सजवलेल्या वाहनातून भावपूर्ण निरोप...

 0
कर्तव्यपूर्तीचा सन्मान, ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना सजवलेल्या वाहनातून भावपूर्ण निरोप...

कर्तव्यपूर्तीचा सन्मान: ग्रामीण पोलीस दलातील 4 अधिकारी सेवानिवृत्त; सजविलेल्या वाहनातून भावपूर्ण निरोप...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) - पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून ते अहोरात्र चालणारे एक कर्तव्य आहे. आयुष्यातील उमेदीची 30 ते 35 वर्षे समाजाच्या सुरक्षिततेसाठी अर्पण केल्यानंतर, आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील 4 अधिकारी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा त्यांच्या जोडीदारासह व कुटुंबासह यथोचित सत्कार करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेले अधिकारी:

 श्री. सुखदेव धोंडिराम लोखंडे (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा)

श्री. दिगंबर मुरलीधर पेरके (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. करमाड)

श्री. विजय बाबुराव पाटील (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. अजिंठा)

श्रीमती सुनीता अशोक लखमल (मपोहेकॉ, नियंत्रण कक्ष)

"आता सण घरी साजरे होतील": पाल्यांच्या भावना

कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांनी व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांच्या काळजाला स्पर्श करून गेले. "वडिलांच्या कर्तव्यामुळे आजवर अनेक सण-उत्सव आम्ही त्यांच्याविना साजरे केले. समाज सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला दुय्यम स्थान दिले. पण आज ते निवृत्त होऊन घरी येत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आता इथून पुढचे सर्व सण आम्ही एकत्र साजरे करू शकू," अशा भावना एका पाल्याने व्यक्त केल्या.

पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन व आश्वासक शब्द

मार्गदर्शन करताना डॉ. विनयकुमार राठोड म्हणाले की, "या अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, सण-उत्सवांची पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. तपासातील त्यांचे कौशल्य आणि शिस्त ही नवीन पिढीसाठी आदर्श आहे. जरी ते आज गणवेशातून निवृत्त होत असले, तरी पोलीस दल हे त्यांचे कुटुंब आहे आणि ते सदैव त्यांच्या पाठीशी राहील." त्यांनी निवृत्त अधिकाऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे व कुटुंबाला पुरेसा वेळ देण्याचे आवाहनही केले.

वाहनांतून घरपोच पाठवणी: एक आगळावेगळा सन्मान

सोहळ्याचा समारोप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने झाला. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून, सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह घरी सोडण्यासाठी फुलांनी व शुभेच्छा फलकांनी सजविलेली विशेष पोलीस वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या वाहनांना मार्गस्थ केले.

या सोहळ्यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. गौतम पातारे, आर.पी.आय. अण्णासाहेब वाघमोडे, पोलीस निरीक्षक (कल्याण) प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक (MT) संतोष वायचळ व कर्मचाऱ्यांनी विशे

ष परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow