मंत्रीमंडळ बैठकीत 46 हजार कोटींहून अधिक विकास कामांना मंजुरी... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
46 हजार कोटींहून अधिक विकास कामे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णय
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.
शहरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या 9 हजार 437 कोटी 90 लाख रुपये खर्चाच्या कामांचा देखील समावेश आहे. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद महसूल विभागाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केल्याचे जाहीर केले. या नामकरणाबाबतची अधिसूचना जाहीर झाल्याने, या दोन्ही नामकरणांवर शिक्कामोर्तबचे झाल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा नवी दिल्ली येथे उभारण्यात येईल. तसेच शहरातील 300 वर्षे जून्या तीन पुलांचे नुतनीकरण करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 2016 नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक येथे झाली. 2016 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, नियोजन, ग्रामविकास, कृषी तसेच पशूसंर्वधन आदी विभागांशी निगड़ीत विविध निर्णय घेण्यात आले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
मराठवाड्यात सुरू असलेल्या कामांची विभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे
जलसंपदा – 21 हजार 580 कोटी 24 लाख रुपये, सार्वजनिक बांधकाम-12 हजार 938 कोटी 85 लाख
पशुसंवर्धन, दुग्धविकास,मस्त्यव्यवसाय- 3 हजार 318 कोटी 54 लाख, नियोजन – 1 हजार 608 कोटी 28 लाख, परिवहन – 1 हजार 128 कोटी 69 लाख, ग्रामविकास – 1 हजार 291 कोटी 44 लाख, कृषी विभाग – 709 कोटी 49 लाख, क्रीडा विभाग –696 कोटी 38 लाख, गृह – 684 कोटी 45 लाख, वैद्यकीय शिक्षण –498 कोटी 6 लाख, महिला व बाल विकास –386 कोटी 88 लाख, शालेय शिक्षण – 490 कोटी ७८ लाख
सार्वजनिक आरोग्य -35.37 कोटी, सामान्य प्रशासन- 287 कोटी, नगरविकास –281 कोटी 71 लाख, सांस्कृतिक कार्य- 253 कोटी 70 लाख, पर्यटन – 95 कोटी 25 लाख, मदत पुनर्वसन – 88 कोटी 72 लाख, वन विभाग - 65 कोटी 42 लाख, महसूल विभाग- 63 कोटी 68 लाख,उद्योग विभाग- 38 कोटी, वस्त्रोद्योग -25 कोटी, कौशल्य विकास-10 कोटी, विधी व न्याय- 3 कोटी 85 लाख
जलसंपदा विभाग - मराठवाड्यातला दुष्काळ हटविणार. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणार. 22.9 अ.घ.फुट पाणी वळविण्याची 14 हजार 40 कोटींची योजना राबविणार.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे रूप पालटवणार. 150 कोटी
वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावला उच्चपातळीचा बंधारा. 1793 हे क्षेत्र सिंचित होणार. 285 कोटी 64 लाख
नियोजन विभाग - मराठवाड्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा विकास करणार
वेरूळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा.156.63 कोटी
श्री तुळजा भवानी मंदिराचा 1328 कोटीचा विकास आराखडा
श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास. 60.35 कोटी
उदगीर येथे बाबांच्या समाधी स्थळ विकास आराखड्यासाठी 1 कोटी
सिल्लोड तालुक्यातील मोजे केळगावचे श्री. मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानाच्या 45 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता
पाथरी येथे साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा. 91.80 कोटी
मानव विकास कार्यक्रमात 100 बसेस पुरविणे. 38 कोटी
महिला व बालविकास विभाग - मराठवाड्यातील 3439 अंगणवाड्यांच्या बांधकामांचा तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम. 386.88 कोटी
शालेय शिक्षण-
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई स्व. दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वर येथे यथोचित स्मारक उभारणार. 5 कोटी
मराठवाड्यातील स्वातंत्रसेनानीच्या गावातील शाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून विकसित करणार. 76 तालुक्यांतून शाळा निवडणार. विविध सुविधांसाठी 95 कोटी.
बीड जिल्ह्यांतील उस तोड कामगारांच्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना. 1600 मुलीना लाभ. 80.0 कोटी
मराठवाड्यातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करणार. 20 टक्के लोकसहभागाची अट शिथिल. 200 कोटी खर्च
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ आणि पालम तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरु करणार. 400 मुलींना शिक्षण घेणे शक्य. 20.73 कोटी खर्च
क्रीडा विभाग-
परभणी जिल्हा क्रीडा संकुला साठी कृषी विभागाची जागा मंजूर. 15 कोटी
औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ स्थापण्यासाठी समिती गठीत. 656.38 कोटी खर्चून अद्ययावत क्रीडा विद्यापीठ उभारणार
कलाग्रामच्या जागेवर एमआयडीसी आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणार.
परळीत 5 कोटींचे तालुकाक्रीडासंकुलउभारणार
उदगीर तालुक्यात जळकोट येथे 5 कोटी खर्चून क्रीडासंकुलउभारणार
परभणी जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी 15 कोटीस मंजुरी
पशुसंवर्धन विभाग
मराठवड्यात दुधाची क्रांती येणार. सर्व जिल्ह्यातील 8600 गावांत दुधाळ जनावरांचे वाटप. 3225 कोटी
तुळजापूर तालुक्यात शेळी समुह योजना राबविण्यासाठी 10 कोटी
देवणी या गोवंशीय प्रजातीच्या उच्च दर्जाची वंशावळ निवड - 4 कोटी
पर्यटन विभाग-
फर्दापूर, औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. प्रत्येकी 50 कोटी
उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथे पर्यटनस्थळ- 5 कोटी
अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाचा विकास. 40 कोटी.
सांस्कृतिक कार्य विभाग-
मराठवाड्यातील विविध स्मारके,प्रसिद्ध मंदिरांचा विकास. अंबेजोगाई, संगमेश्वर, तर, महादेव मंदिर माणकेश्वर, तेर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, होट्टल मंदिर, भोग नृसिंह, गुप्तेश्वर मंदिर धाराशूर, चारठाणा मंदिर समुह, आदि. 253 कोटी 70 लाख.
महसूल विभाग-
बीड जिल्हाधिकारी इमारत उभारणार. 63.68 कोटी
वसमत येथे मॉडर्न मार्केटच्या उभारणीसाठी जागा.
लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची मध्यवर्ती प्रशासकीय शासकीय इमारत.
वन विभाग-
लातूर, वडवाव, नागनाथ टेकडी विकास करणार. 5.42 कोटी
माहूर येथे वनविश्रामगृह बांधणार.
मदत व पुनर्वसन-
वसमत मौजे कुरुंदा येथे पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी 33.03 कोटी
मराठवाड्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणार. प्रादेशिक आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे बळकटीकरण.55.69 कोटीखर्च.
धारुर तालुक्यातील सुकळी या गावचे पुनर्वसन.
उद्योग विभाग-
आष्टीला कृषिपुरक क्षेत्रासाठी एमआयडीसी उभारणार. 38 कोटी
वसमत, चाकूर, वडवणी (पुसरा), मौजे सिरसाळा ता. परळी येथे एमआयडीसी स्थापन करणे.
उदगीर आणि जळकोट येथे एमआयडीसी मंजूर
कौशल्य विकास विभाग-
धाराशिव विश्वकर्मा रोजगार योजना राबविणार
सार्वजनिक बांधकाम-
मराठवाड्यातील रस्ते सुधारणार 300 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेणार. 2400 कोटी
नाबार्ड अर्थसहायातून मराठवाड्यात 44 कामे हाती घेणार. 109 कोटी
हायब्रिड अॅन्यूईटी योजनेतून मराठवाड्यातील 1030 कि.मी. लांबीचे रस्ते सुधारणार. 10 हजार 300 कोटी
साबरमती घाटाप्रमाणे नांदेडचा गोदावरीघाटाचे सौंदर्य खुलणार. रिव्हर फ्रंटसाठी 100 कोटीखर्च
औसा तालुक्यातील मातोळा येथे तसेच कंधार तालुक्यातील मौजे कंल्हाळी येथे हुतात्म्यांचे स्मारक उभारणे.
लोहारा तालुक्यातील मौजे हिप्परगा येथे बहुउद्देशीय इमारत उभारणार.
पाटोदा येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस निधी.
बीड येथे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम.
लातूर-बार्शी-टेंभुर्णी महामार्ग चार पदरी करणे.
ग्रामविकास विभाग-
मराठवाड्यातील 75 ग्रामपंचायतींना आता स्वत:चे कार्यालय मिळणार आहे. पुढील 3 वर्षात 180 कोटी देणार. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत.
बीड येथे जिल्हापरिषदेची नवीन इमारत. 35 कोटी.
उर्जा विभाग
परळी औष्णीक विद्युत केंद्र येथील प्लांट्सना मंजुरी.
गृह विभाग
नांदेड शहरात सीसीटिव्हीचे जाळे.शहर सुरक्षित होणार. 100 कोटी
18 निजामकालीन पोलीस स्टेशन्सचा होणार कायापालट. 92.80 कोटी
बीड, परळी, अंबाजोगाई येथे पोलीस हौसिंग. 300 कोटी.
शहरातील येथील क्रांतीचौक पोलीस ठाणे इमारत आणि निवासस्थाने तसेच मिल कॉर्नर येथील निवासस्थाने. 191 कोटी 65 लाख.
परिवहन विभाग-
मराठवाड्यातील विविध शहरांतील बस स्थानकांमध्ये अमुलाग्र बदल करणार
छत्रपती संभाजीनगर विभागात आधुनिक 1197 ई-बसेस चालवणार . 421कोटीस मान्यता
औरंगाबाद विभागात वाहन निरिक्षण व परिक्षण केंद्र स्थापन करणार. 135.61 कोटी
राज्यातील 9 राष्ट्रीय महामार्गावर Intelligent Traffic Management Systemबसविणार. पुणे- औरंगाबाद महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता. 188.19 कोटी खर्च येणार
औरंगाबाद व नांदेड येथे स्वयंचलित चाचणी पथ प्रकल्प.10.37 कोटी
वरील सर्व उपक्रमांना मिळून एकूण 1 हजार 128 कोटी 69 लाख निधी.
नगरविकास विभाग-
मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये 640.29 कोटी निधी. त्यापैकी रुपये 534.74 कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये 505.55 कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर
केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 - औरंगाबाद शहरासाठी रुपये 2740.75 कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प रुपये 275.68 कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प तर रुपये 2.78 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प असे एकूण रुपये 3059.21 कोटी किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
नांदेड वाघाळा महानगरपलिकेसाठी रुपये 329.16 कोटी किमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प
अर्धापूर नगरपंचायतेसाठी रुपये 25.13 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
भूम नगरपरिषदेसाठी रुपये 1.83 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
माहूर नगरपरिषदेसाठी रुपये 24.62 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
पेठ उमरी नगरपंचायतेसाठी रुपये 3.60 कोटी किंमतीचा सरोवर पुनरुज्जीवनाचा प्रकल्प
हिंगोली शहरासाठी रुपये 104.28 कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
औंढा नागनाथ तिर्थक्षेत्रासाठी रुपये 36.44 कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
खुलताबाद शहरासाठी रुपये 21.32 कोटी किमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
नळदुर्ग शहरासाठी रुपये 93.42 कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
माजलगांव शहरासाठी रुपये 46.54 कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
लोहा शहरासाठी रुपये 66.39 कोटी किंमतीचा पाणीपुरवठा प्रकल्प
तुळजापूर तिर्थक्षेत्रासाठी रुपये 158.52 कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
उमरगा शहरासाठी रुपये 126.82 कोटी किंमतीचा रस्ते विकास प्रकल्प
अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्प रुपये 16.56 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
जालना शहर पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये 35 MLD क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र व 15 MLDक्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यासाठी रुपये 56.00 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.रुपये 47.98 कोटी
नांदेड वाघाळा महानगरपालिका घनकचरा प्रकल्प- रुपये 8.07 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
श्री. क्षेत्र परळी वैजनाथ ज्योर्तिलिंग विकास आराखडा- रुपये 286.68 निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
औंढा नागनाथ विकास आराखडा रुपये 50 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
मराठवाड्यातील विविध शहरांमधील मुलभूत सोयीसुविधा विकासासाठी एकूण रुपये 640.29 कोटी निधी . त्यापैकी रुपये 534.74 कोटी नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रासाठी तर रुपये 505.55कोटी महानगरपालिका क्षेत्रासाठी मंजूर
परभणी शहराची रुपये 157.11 कोटी किंमतीची समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येईल.
परभणी शहराची रुपये 408.83 कोटी किंमतीचा मलनि:स्सारण प्रकल्प मंजूर करण्यात येईल.
लातूर रस्ते विकास प्रकल्प रुपये 41.36 कोटी मंजूर करण्यात येईल.
नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता लातूर महानगरपालिकेस रुपये 26.21 कोटी व परभणी महानगरपालिकेस रुपये 11.75 कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
उदगीर नगरपरिषदेस नाट्यगृहाच्या बांधकामासाठी रुपये 12 कोटी निधी मंजूर करण्यात येईल.
उदगीर शहरात भूमीगत गटार यंत्रणा.
नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील कार्यान्वीत असलेल्या घनकचरा प्रकल्प व प्रगतीपथावर असलेल्या बायोगॅस प्रकल्पासाठी रुपये 8.07 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
माहिती व तंत्रज्ञान संचालनालय-
मराठवाड्यात 432 ग्रामपंचायतीना भारतनेट जोडणी वर्षभरात देणार. 286 कोटी.
औरंगाबाद व नांदेड येथे विद्यापीठ परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यासाठी माहिती संग्रहालय.
(रोजगार हमी योजना)
मराठवाड्यात 4 लाख विहिरींचा कार्यक्रम राबविणार.
(कृषी विभाग)
आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बीड येथे सीताफळ आणि इतर फळांवर प्रक्रिया उद्योग. ५ कोटी
हळद संशोधनास आता वेग येणार. हिंगोलीतील हरिद्रा संशोधन केंद्रासाठी १०० कोटी.
अंबाजोगाई येथील शासकीय कृषी महाविद्यालयात मुलामुलींचे वसतीगृह सुरु.105 कोटी.
सार्वजनिक आरोग्य विभाग
अहमदपूर, चाकूर, माजलगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर, धारुर तालुक्यातील तेलगाव तसेच वडवली येथे ग्रामीण रुग्णालयास निधी, किनगाव ग्रामीण रुग्णालय बांधकाम. एकूण निधी 374 कोटी 91 लाख.
(मृद व जलसंधारण)
अहमदपूर तालुक्यातील मानार नदीवर 9 कोल्हापुरी बंधारे. पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी आणि उंबर विहिरा साठवण तलाव, आष्टी आणि शिरुर तालुक्यात कोल्हापूर बंधाऱ्यांचे लातूर टाईप बॅरेजमध्ये रुपांतर आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी, घळाटी, टोकवाडी आणि पोखर्णी नदीवर सिमेंट नाले बंधारे.
(अल्पसंख्याक विकास)
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.
औरंगाबाद येथे अल्पसंख्याक आयुक्तालय व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कार्यालय.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अनुदानात वाढ. तसेच पारंपारिक शिक्षणाबरोबर बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे मदरसांचे अनुदान 2 लाखावरुन 10 लाख करणे.
इतरही घोषणा:परळी वैजनाथ विकास आराखड्यात आयुर्वेद पार्कचा समावेश, वेरूळ येथे शहाजी राजे भोसले यांचे स्मारक
What's Your Reaction?