शिवसेनेच्या अंगिकृत संघटना अमिषाला बळी न पडता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

 0
शिवसेनेच्या अंगिकृत संघटना अमिषाला बळी न पडता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

शिवसेनेच्या अंगिकृत संघटना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी

आमीषाला बळी न पडता आजही जनतेच्या कामात व्यस्त

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली आढावा बैठक

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) - शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामासाठी शिवसैनिक नेहमीच धावून जातो. अनेकांना पदे दिल्यानंतर ते स्वार्थापोटी पळून गेले मात्र, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अंगिकृत संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलतांना व्यक्त केला. शिवाई ट्रस्ट, शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत सर्वच अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, महिला आघाडीच्या संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, जिल्हासंघटक आशा दातार, भाकासेचे प्रभाकर मते पाटील, एसटी कामगार सेनेचे शिवाजीराव बोर्डे पाटील, पुरोहीत संघटनेचे सुभाष मुळे गुरुजी, रिक्षाचालक संघटनेचे राजेंद्र गरड पाटील, व्यापारी आघाडीचे रमेश रुणवाल, राम वारेगावकर, प्रफुल्ल मालानी, शिक्षक सेनेचे नामदेव सोनवणे, संदीप पाटील, दत्ता पवार, सचिन वाघ, विलास पाटील, माजी महापौर शीला गुंजाळे, लोकसभा संघटक सुदाम सोनवणे, आदी उपस्थित होते.

लोकसभा, विधानसभा निवडणूकीत सर्वच अंगिकृत संघटना ताकदनिशी उभ्या राहील्या आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत अंगिकृत संघटना ताकदनिशी उभ्या राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीस महिला आघाडीच्या मीरा देशपांडे, रेणूका जोशी, नलीनी बाहेती, विजया पवार, अरुणा भाटी, कोमलसिंग इंगळे, मनीष भारुका, महेंद्र गांगुर्डे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपजिल्हासंघटक श्रीरंग पाटील आमटे, राजू इंगळे, हिरालाल सलामपुरे, आनंद तांदुळवाडीकर, संतोष जेजुरकर, अरविंद धिवर, अनिकेत भोसले, निलकंठ राठोड, रियाज पठाण, दत्ता शिंदे, पद्मनाभ चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, मयुर ठाकूर, मिलींद दामोदरे, विशाल खंडागळे, किशोर जगताप, संतोष जाधव, नारायण खोचे, दिगंबर धनक, विष्णू जाधव, देवा जाधव, अनिल टाकळकर, विलास सातदिवे, राजू देहरे, भागवत देशमुख, लक्ष्मण मुळे, विजय सुर्यवंशी, शंकर राठोड आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow