इम्तियाज जलील यांच्या अल्टिमेटमला गंभीरपणे घेत नाही त्यांच्यावरच गुन्हा दाखल करु - आमदार संजय सिरसाट
इम्तियाज जलील यांच्या अल्टिमेटमला गंभीरपणे घेत नाही, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करु - आमदार संजय सिरसाट
छ.संभाजीनगर(औरंगाबाद),दि.5(डि-24 न्यूज) रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांना पाच दिवसांत अटक करावी अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बुधवारी केली होती. अटकेची कारवाई झाली नाही तर मुंबईत रॅली काढण्यात येईल असा इशारा दिला होता. या इशा-यानंतर शिंदे सेनेचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले आमदार नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले होते त्याबद्दल त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण रामगिरी महाराज यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही, केले असेल तर इम्तियाज जलील यांनी दाखवून द्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांच्या व्यासपीठावरुन कोणत्याही समाजाच्या धर्मगुरुच्या केसालाही धक्का लाऊ देणार नाही असे त्यांना म्हणायचे होते. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही कोणी कोणाच्या धर्माच्या विरोधात वक्तव्य केले तर त्यांची गय केली जाणार नाही. इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करु. विरोधी पक्षातील नेते काही बडबड करत आहेत त्यांच्यावर सुध्दा कार्यवाही करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही. महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला वेगळे सांगून आणि दलित समाजाला संविधान बदलणार असे सांगून मते लाटली. महाविकास आघाडी एमआयएमला सोबत घेतले तरी गैर नाही. त्यांची तशी विचारधारा राहिलेली नाही. महाविकास आघाडी राज्यात दंगल कधी घडतात त्याची वाट पाहत आहे. राज्याचे वातावरण खराब होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. असे सिरसाट म्हणाले.
What's Your Reaction?