उबाठाला धक्का, मिथून व्यास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...

 0
उबाठाला धक्का, मिथून व्यास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश...

शिवसेना उबाठा गटाचे उपशहर प्रमुख श्री.मिथुन व्यास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश.

शिवसेना उबठा गटाला मोठे खिंडार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि. 30(डि-24 न्यूज) -

शिवसेना उबाठा गटाचे उपशहर प्रमुख श्री. मिथुन व्यास यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला असून, छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना उबाठा गटाला मोठा खिंडार पडले आहे. गुलमंडी, राजा बाजार, पानदरीबा या भागातील शेकडो कार्यकर्ते श्री. मिथुन व्यास यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. हा प्रवेश सोहळा तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमादरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. अतुल सावे आणि प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. संजय केनेकर यांनी बाहेर दौऱ्यावर असल्याने फोनवरून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी

राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड; शहराध्यक्ष श्री. किशोर शितोळे; माजी महापौर श्री. भगवान बापू घडामोडे; माजी प्रदेश उपाध्यक्ष श्री. बसवराज मंगरूळे; प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल मकरीये; सौ. शालिनीताई बुंदे; श्री. संजय जोशी; श्री. जगदीश सिद्ध; श्री. प्रमोद राठोड; श्री. दयाराम वसई; श्री. दिलीप थोरात; श्री. कचरू घोडके; श्री. जालिंदर शेंडगे; सौ. उज्वलाताई दहिफळे; सौ. मनीषाताई भन्साली; श्री. सागर निळकंठ; श्री. बबन नरवडे; श्री. शिवाजी दांडगे; श्री. महेश माळवदकर; श्री. सखाराम पोळ; श्री. हर्षवर्धन कराड; श्री. ताराचंद गायकवाड; सौ. छायाताई खाजेकर उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख पदाधिकारी:

मिथुन सतीश व्यास – उपशहर प्रमुख (शिवसेना उबाठा), युवा सेना जिल्हा चिटणीस; विष्णू क्षीरसागर – उपशहर प्रमुख युवासेना; संजय महागुडे – उपशहर प्रमुख युवासेना; योगेश जोशी – उपशहर प्रमुख शिवसेना; शैलेश सुरडकर – उपशहर प्रमुख युवासेना; आकाश झुंजकर – विभाग प्रमुख; पंकज जैस्वाल – शाखाप्रमुख; प्रभात पूरवार – शाखाप्रमुख; अभिषेक डोंगापुरे – गटप्रमुख; आशितोष खंडेलवाल – गटप्रमुख; दिनेश बियाणी – शाखाप्रमुख गांधीनगर; दीपनकर दिवेर – जिल्हा उपाध्यक्ष (काँग्रेस); पंडित वेलदोडे – मराठवाडा कोषाध्यक्ष आझाद समाज पार्टी; कांतिलाल कोळी - शिवसेना शाखा प्रमुख.

 सहभागी कार्यकर्ते:

रोहित आहुजा, केतन साहुजी, नितीन राठी, तुषार दरख, परेश जैन, तुषार चोरडिया, सचिन बंब, निखिल पारख, सचिन अचलीया, यश श्रीमाळी, शुभम ढेंगे, अभिषेक क्षीरसागर, गुड्डू डोंगरे, अंकित सोनी, अमित कांकरिया, ईश्वर नहाटा, मयूर सुराणा, प्रफुल कोचर, विजय जैन, निलेश फाळके, अक्षता अग्रवाल, अजिंक्य सिंधवी, आनंद सुराणा.

मंडळांचे पदाधिकारी व पाठिंबा:

जागृत विघ्नहर्ता गणेश मंडळ, श्री हरी गणेश मंडळ, कुंदन गणेश मंडळ.

या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद शहरात आणखी वाढली असून शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर व जनतेसाठी अखंड सेवा करण्याच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत. हा प्रवेश पक्षाची ताकद अधिक बळकट करणारा असून शहरातील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे असे मत डाॅ.भागवत कराड यांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow