जागतिक दिव्यांनी दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार...

 0
जागतिक दिव्यांनी दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार...

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत तापडीया नाट्यगृह निराला बाजार येथे दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांगांचा तसेच दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचा सत्कार करण्यात आला.

 अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाबासाहेब अरवत आदी मान्यवर उपस्थित होते.

 दिव्यांग कल्याण विभागाचा परिचय, दिव्यांग कल्याणासाठी शासकीय योजना, विभागाचे धोरण, कायदे, नियम, दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाय याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविणारे खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यास जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा येथील मुख्याध्यापक व कर्मचारी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. मुख्याध्यापक कैलास निकम यांनी सूत्रसंचालन केले तसेच श्रीमती यामिनी काळे यांनी आभार प्रदर्शन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow