इंडियाचा 14 टिवी एंकरवर बहिष्कार...तर काँग्रेसने म्हटले द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही...
इंडियाचे 14 टिवी एंकरवर बहिष्कार...तर काँग्रेसने म्हटले द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही...
नवी दिल्ली, दि.14(डि-24 न्यूज) देशातील विरोधीपक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी(इंडियन नॅशनल डेव्हलोपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स) ने 14 टिव्हि एंकरवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने तर द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही असे म्हटले आहे.
या प्रसिद्ध 14 एंकरची यादीच इंडिया आघाडीने प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सुधीर चौधरी, अमिश देवगन, अर्णब गोस्वामी, रुबिका लियाकत, आनंद नरसिम्हा, अमन चोप्रा, अदीती त्यागी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, शिव आरुर, सुशांत सिन्हा या नामांकित एंकरची नावे आहेत. हे एंकर विविध टीव्ही चॅनेलवर शोचे हाॅस्ट आहेत.
काँग्रेसने सोशलमिडीयावर तर एक निवेदन जारी केले आहे त्यामध्ये सांगितले आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता काही टीव्ही चॅनेलवर द्वेशाचा बाजार भरवला जातो. अशा स्थितीत इंडिया आघाडीने ठरवले आहे की आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही. भारत द्वेषमुक्त भारत...हे आमचे उद्दिष्ट आहे. भारत एक होईल... भारत जिंकेल असे म्हटले आहे.
31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली त्यामध्ये 28 पक्षांनी सहभाग घेतला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सह 28 पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होत समन्वय व प्रचारासह पाच समिती बनवली. पुढची बैठक नवी दिल्ली येथे तर सभा भोपाल येथे होणार असल्याची माहिती मिळाली आ
हे.
What's Your Reaction?