आदर्शच्या ठेवीदारांना मिळणार पैसे...इम्तियाज जलिल यांचे आंदोलन आणि डॉ.कराड यांचे प्रयत्न
 
                                अर्थ राज्यमंत्री
डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये
आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे देण्याबाबत
महत्वपूर्ण बैठक...
औरंगाबाद,दि.14(डि-24 न्यूज) आदर्श घोटाळ्यात खासदार इम्तियाज जलिल हे मागिल काही महिन्यांपासून ठेवीदारांना पैसे मिळावे यासाठी अक्रामक आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनानंतर प्रशासन हलले व कार्यवाही सुरू झाली काही आरोपींना अटक झाली तर काही आरोपींना जामीन मिळाला. आता सत्ताधारी पक्षातील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे ठेवीदारांचा मदतीला धावून आले आहे. त्यांनी या विषयावर आज बैठक घेत आवश्यक सूचना दिल्या.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे कसे परत करता येतील या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये आज संपर्क महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये आदर्श पतसंस्थेच्या मालमत्ता विक्री, सुरक्षित कर्जाचे इतर बँकेत हस्तांतरण करणे, आणि कर्जाची तत्काळ वसुली करण्या बाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. आदर्श पतसंस्थेच्या दोन मालमत्तांची बाजार भावाप्रमाणे बारा कोटी रुपये किंमत असून ही सर्व प्रॉपर्टी विक्री करून, लवकरच ठेवीदारांना पैसे मिळवून द्या,असे स्पष्ट आदेश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या बैठकीत दिले आहेत.
आदर्श पतसंस्थेमध्ये 54128 ठेवीदारांच्या एकूण 353.58 कोटी रुपयांच्या ठेवी असून ,यामध्ये 25 हजार रुपये पर्यंत ठेवीदारांची संख्या ही 36 हजार 781 इतकी आहेत. संस्थेच्या मालकीच्या दोन प्रॉपर्टी असून त्याची किंमत अनुक्रमे 8.5 कोटी, 3.5 कोटी रुपये इतकी असून बाजारभावाप्रमाणे मालमत्तांची वेगळी करण्यात येणार असून, ठेवीदारांचे पैसे परत मिळणार आहे त्यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.
या सर्व ठेवीदारांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी तातडीने दिलासा देण्यासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली या
बैठकीमध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी निर्णय घेण्यात आला असून, आदर्श पतसंस्थेच्या मालमत्ता विक्री करण्यात यावी.
सुरक्षित कर्जाचे इतर सार्वजनिक बँकेत हस्तातरण करावे. यामध्ये किमान शंभर कोटी रुपयांचे सिक्युअर लोन असून हे लोन इतर बँकांनी हस्तांतरित करण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहेत.
आणि आदर्श पतसंस्थेच्या पीशोर येथील साडेआठ कोटी रुपये आणि नाचनवेल येथील साडेतीन कोटी रुपये या मालमत्ता बाजारभावाप्रमाणे विक्री करण्यात यावीत. प्रशासक काकडे यांनी सांगितले की या सर्व मालमत्तांची लवकरात लवकर विक्री करण्यात येणार असून यांनी सांगितले की, सहकार विभागाकडून ठेवीदारांना पैसे देण्या विषयी कारवाई लवकर होईल असे म्हंटले आहे.
आदर्श नागरिक पतसंस्थेमध्ये एकूण कर्जदार संख्या 1190 असून त्यापैकी पाच लाखापर्यंत कर्ज असलेल्या कर्जरांची संख्या 1662 इतकी आहे.
या कर्ज रकमेवरती 21.56 कोटी आहे.
तसेच पाच लाखावरील कर्जदारांची संख्या 1662 इतकी असून, त्यांच्याकडून 21.56 कोटी आणि पाच लाखावरील 328 कर्जदारांकडून 250.95 कोटी येणे बाकी आहेत.
थकीत कर्जाची लवकरात लवकर वसुली संदर्भातही पोलिसांनी कारवाई करावी.असेही निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आले .
या बैठकीसाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, डी. डी. आर. डॉ. मुकेश बारहाते, आदर्श नागरिक पतसंस्थेचे प्रशासक सुरेश काकडे ,धनंजय चव्हाण विशेष लेखापरीक्षक ,प्रवीण फडवणीस उपनिबंधक सहकारी संस्था, उल्हास जोशी, शंकर भुसारे, सी ओ आदर्श महिला नागरी बँक एस के गायके लेखापरीक्षक, डी.आर मातेरे, सहाय्यक निबंधक सिल्लोड बी पी रोडगे, सहाय्यक निबंध खुलताबाद
महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर महेश डांगे,
निकुंभ गर्ग रीजनल हेड सेंट्रल बँक, किशोर बाबू बँक ऑफ बडोदा ,संदीप कुमार, मंगेश केदार लीड बँक मॅनेजर ,पोलीस निरीक्षक एस बी पवार, बँक ऑफ इतर अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            