कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता पे-स्लिप मिळणार - मनपा आयुक्त जी श्रीकांत

 0
कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता पे-स्लिप मिळणार - मनपा आयुक्त जी श्रीकांत

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता पे स्लीप मिळणार...

आत्मनिर्भर महानगरपालिका करण्यासाठी यशस्वी वाटचाल

प्रशासक यांचे प्रतिपादन

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) महानगरपालिका आत्मनिर्भर महानगरपालिका करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू करण्यात आली आहे तसेच महानगरपालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता पे स्लीप मिळणार आहे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.

    26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालय येथे सकाळी 8 वाजता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

  यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, शहर अभियंता ए.बी.देशमुख, उप आयुक्त सोमनाथ जाधव, अंकुश पांढरे, राहुल सुर्यवंशी, मंगेश देवरे, नंदा गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, नगर रचना उप संचालक मनोज गर्जे, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, स्वातंत्र्य सैनिक, सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शालेय विद्यार्थी , माजी सैनिक ,कर्मचारी ,नागरिक यांची उपस्थिती होती.

 यावेळी आयुक्त यांच्या सह सर्व अधिकारी यांनी प्रथमच महानगरपालिकेची सेरीमोनियल टोपी परिधान केली होती.

  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशासक यांनी विविध बाबीचा उहापोह केला.

यात प्रामुख्याने पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, उद्यान,

आस्थापना, स्मार्ट बस, नवीन कर्मचारी भरती व इतर बाबींचा समावेश होता.

पाणी पुरवठा , ड्रेनेज, उद्यान अशा प्रत्येक विभागात नावीन्य पूर्ण काम करून आपण शहरातील नागरिकाला सेवा देण्यासाठी कटिबध्द आहोत असे ते म्हणाले.

 आपले शहर संपूर्ण सेफ्टी टँक मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पडेगाव मिटमिटा हा भाग ही सेफ्टी टँक मुक्त होणार आहे यामुळे आपल्याला भूगर्भातील पाणी प्रदूषित होण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपल्या शहराचे मानांकन वाढत आहे. स्वच्छ सुंदर इंदोर शहरासारखे आपले शहर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि या दृष्टीने मनपाची वाटचाल सुरू आहे. सामान्य जनतेला कोणताही त्रास न होता कचऱ्यावर 100 % प्रक्रिया करून शहर स्वच्छ सुंदर करणार आहोत. यात बायो मेडिकल वेस्ट चे आधुनिकीकरणाचा समावेश आहे.

 महानगरपालिकेत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी कर्मचारी प्रमाणे आता पुढील महिन्यापासून पे स्लीप मिळणार आहे या करिता सबंधित कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात येणार आहे.असे ते म्हणाले.

स्मार्ट स्कूल ,सावित्री कंट्रोल रूम चा डंका जगभर वाजत आहे. ही एक गौवपूर्ण बाब आहे.

लवकरच आणखी नवीन 135 स्मार्ट बस शहर बस सेवेत दाखल होणार असून आता 235 स्मार्ट बस द्वारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे.

याकरिता एक मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बोटनिकल उद्यान येथे बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन पार्क विकसित करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पुनर्जीवन प्रकल्प यशस्वी पणे राबविला जात आहे. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनां,उपक्रम यासाठी अजून मेहनतीने सर्व काम करतील अशी आशा व्यक्त करतो असे ते यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले.

प्रशासकीय समिती कक्षाचे उद्घाटन...

महानगरपालिका मुख्यालय येथे नवीन अद्यावत प्रशासकीय समिती कक्षाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow