आता शहरात वाहतूक नियम मोडल्यास आपोआप घरी येईल ई-चलान, वाहन जपून चालवा
वाहतूक सुरक्षेसाठी स्मार्ट सिटी...
वाहतूक नियम मोडल्यावर आपोआप येईल ई चलान
औरंगाबाद,दि.27(डि-24 न्यूज) स्मार्ट सिटी अंतर्गत बसण्यात आलेल्या ए एन पी आर कॅमेरे अर्थात ऑटोमैटिक नंबर प्लेट रेकिग्निशन यंत्रणाचे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे ह्यांचा हस्ते पोलीस आयुक्तालय स्थित कमांड एंड कंट्रोल सेंटर मध्ये प्रजासत्ताक दिन निमित्ताने उद्घाटन करण्यात आले.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्शन आणि रेड लाइट व्हायलेशन डिटेक्शन कॅमेरा असलेली अत्याधुनिक प्रणाली आहे. 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या यंत्रणेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याळेवेस पोलीस आयुक्त मनोज लोहिया, महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी जी. श्रीकांत, मनपा अतिरिक्त आयुक्त आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, जिल्हा परिषदचे सीईओ विकास मीना, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, डीसीपी (मुख्यालय) शिलवंत नांदेडकर आणि डीसीपी (गुन्हे) अपर्णा गीते हे उपस्थित होते.
हे सिस्टीम व कॅमेरे हे इंटिग्रेटेड सिक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन प्लॅटफॉर्म प्रोजेक्ट (आयस्कोप) चा भाग आहेत आणि एक राज्य एक चलन प्रणालीसह एकत्रित केले आहेत, जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना स्वयंचलितपणे नोंद घेऊन चलन जारी करतील. रेड लाइट तोडणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, विना हेलमेट दुचाकी चालवणे किंवा रॉंग साइड गाडी चालवणे व इत्यादी नियम भंगाचा यात समावेश आहे.
शहरातील महत्त्वाच्या चौकांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
हे कॅमेरे बसवण्याचा उद्देश लोकांना वाहतूक नियमांचे जबाबदारीने पालन करण्यास आणि अपघातांची संख्या कमी करुन रस्ता सुरक्षा प्रदान करणे आहे. चोरीची वाहने ओळखणे, गुन्हेगारांचा माग काढणे आणि कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यातही कॅमेरे मदत करतील. पोलीस विभाग, महापालिका आणि स्मार्ट सिटी ह्यांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे नागरिकाना आवाहन केले आहे.
What's Your Reaction?