स्मारकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर मनसेचा आक्षेप...! होणार स्ट्रक्चरल ऑडिट

स्मारकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर मनसेचा आक्षेप...! होणार स्ट्रक्चरल ऑडिट
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) प्रबोधनकार ठाकरे नागर एन-2 सिडको येथे उभारले जाणारे जिजाऊ माँसाहेब स्मारकाच्या निकृष्ट दर्जाचे बांधकामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. या विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी काही दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
यापूर्वी 9 जानेवारी 2025 रोजी मनसेने याप्रकरणी निवेदन दिले होते. मात्र समाधानकारक कारवाई झाली नसल्याने 3 एप्रिल रोजी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना जाब विचारण्यात आला. 8 एप्रिल पर्यंत थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी भेटीसाठी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांना निमंत्रित करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी मनसेचे आशोक पवार, विनोद भाले, अशोक कराळे पाटील, अमित जैस्वाल, मोनू तुसे, रविंद्र गायकवाड, मनोज भिंगारे, अक्षय देवतवाल आदी उपस्थित होते. जर दोषींवर कारवाई झाली नाही तर मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?






