रस्त्यावर फेरीवाल्यांनी व्यवसाय न करता गल्लीत करावे, समितीचा निर्णय
फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय मुख्य रस्त्यावर न करता गल्लीमध्ये फिरून करावा...
रस्ते व सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त राहण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक - प्रशासक
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
फेरीवाल्यांनी मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपला व्यवसाय निवासी भागात गल्लीमध्ये फिरून करावा असे आवाहन सुमोटो जनहित याचिका १०९/२०१५ मध्ये गठित केलेल्या समितीच्या बैठकीत करण्यात आले.
दि.1 जानेवारी 2025 रोजी मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक व समितीचे अध्यक्ष जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली
मा.उच्च न्यायालय ,मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी सुमोटो जनहित याचिका क्रं.109/2015 मध्ये गठित केलेल्या समितीची बैठक पार पडली.या वेळी अतिरिक्त आयुक्त 2 संतोष वाहुळे, सदस्य तथा विधीज्ञ अँड.अभिजित फुले, सिडको प्रशासक भागवत बिघोत, उप अभियंता नगररचना, झोन क्रमांक 05, 06 व 07 यांचे सहायक आयुक्त यांची उपस्थिती होती. या बैठकीत विविध विषयांवर मुद्देनिहाय सविस्तर आढावा व चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत झालेल्या चर्चेनूसार महानगरपालिकेतर्फे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणा-या फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई करण्यात येते. तथापि
फेरीवाल्यांनी नागरिकांना माल विकण्यासाठी गल्लींमध्ये फिरून व्यवसाय करणे आवश्यक आहे. परंतू ते मुख्य रस्त्यावर थांबून वाहतुकीला अडथळा करून व्यवसाय करतात ते चुकीचे आहे. फेरीवाल्यांनी मुख्य रस्ते वगळता निवासी भागात फिरून व्यवसाय करावेत.
रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त राहणेसाठी राज्यातील इतर शहरांप्रमाणे आपल्या शहरात नागरिकांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येते. त्यासाठी शहरातील नागरिकांनी सुध्दा सक्रीय सहभागी होणे आवश्यक आहे
असे आवाहन समिती अध्यक्ष व सदस्यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
What's Your Reaction?