खुशखबर...गरवारे स्टेडियमवर उद्यापासून बीसीसीआयचे क्रीकेट सामने

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर उद्यापासून बीसीसीआयचे सामने
एन-2 येथील एडीसीए मैदान व एमजीएम मैदानावर सुद्धा सामने होणार
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) महानगरपालिकेने गरवारे क्रिकेट स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे सामने व्हावे या दिशेने एक महत्वाचा कार्य म्हणून स्टेडियम मधे फ्लॅडलाइटस बसवण्याचे काम, पिच मेकओवर पूर्ण करण्यात आले होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत ह्यानी “आम्हाला खेळू द्या” या मोहीमेअंतर्गत मनपाच्या गरवारे स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे क्रिकेट स्टेडियम म्हणून विकसित करण्याचे काम केले आहे. त्याचे आता परिणाम भेटत आहेत.
स्टेडियमचा विकासांतर्गत आधी तज्ज्ञाचा मदतीने पिच सुधारण्याचे कार्य पूर्ण करण्यात आले होते व रात्रीचे सामने साठी सुसज्ज करण्यासाठी मनपा विद्युत विभागामार्फत फ्लडलाईटस बसवण्याचे काम करण्यात आले होते.
उद्या पासून बीसीसीआयचे महिला अंडर-19 सामने
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे सामने गरवारे स्टेडियमवर व्हावे यासाठी प्रयत्नांना यश मिळत आहे. महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या बीसीसीआयचे महिला अंडर 19 सामने गरवारे स्टेडियम येथे शनिवार पासून आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्ण देशातील आंतरराष्ट्रीय स्तराचे अनेक महिला खेळाडू भाग घेणार आहेत. हे शहरासाठी अत्यंत महत्त्वा
चे आहे.
What's Your Reaction?






