पोलिस विभागात मानाचा तुरा...आयर्न मॅन एसिपि साईनाथ ठोंबरेंची उंच भरारी

 0
पोलिस विभागात मानाचा तुरा...आयर्न मॅन एसिपि साईनाथ ठोंबरेंची उंच भरारी

पोलिस विभागात मानाचा तुरा...आयर्न मॅन एसिपि साईनाथ ठोंबरेंची उंच भरारी

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) महाराष्ट्र पोलीस दलात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयर्न मॅन एसिपि साईनाथ ठोंबरें यांनी गोवा हाफ आयर्न मॅन स्पर्धेत 8 तास 23 मिनटात पूर्ण केले. स्विमिंग 1.9 किमी 59.52 मिनटात, सायकलिंग 90 किमी 4.01 तासात व रनिंग 21 किमी 3.06 तासात पूर्ण केले. मिरामर बीच येथे समुद्र लाटांमध्ये स्विमिंग, सायकलिंगचा रुट हा कठीण चढणीचा व खडतर होता तर रनिंग साठीही सुध्दा चढ असताना ठोंबरे यांनी या स्पर्धेत यश संपादन केल्याने त्यांचे खेळ जगतात व पोलीस दलात अभिनंदन होत आहे. त्यांना या स्पर्धेत मेडल मिळाले आहे. यश संपादन केल्याने पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow