बीडकीनचे चिमूकले खेळाडू तायक्वांदोत तिरंगा फडकावणार...!
बीडकीनचे चिमूकले खेळाडू तायक्वांदोत तिरंगा फडकावणार...!
बीडकीन(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा, पैठण तालुक्यातील बीडकीनचे चिमूकले तायक्वांदो खेळाडू कोच डॉ.हाफिज इम्रान यांनी मेहनत घेतली. पाच शालेय विद्यार्थी असलेल्या खेळाडूंना तयार केल्यानंतर तायक्वांदो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी इंडियन टिममध्ये पात्र ठरलेले हे खेळाडू उद्या दिल्लीसाठी रवाना होणार असल्याने त्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढावा व स्पर्धेत गोल्ड मेडल घेत भारताचा तिरंगा फडकावण्यासाठी एवढ्या कमी वयात हे खेळाडू सज्ज झाले असल्याने गावातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी एसडिपिआय(सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे) प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, जुबेर पटेल, समीर शहा व आदी उपस्थित होते.
मागिल 14 वर्षांपासून तायक्वांदोचे इंटरनॅशनल कोच डॉ.हाफिज इम्रान यांनी अनेक खेळाडू घडवले आहे. हा ऑलिंपिक खेळ असल्याने विद्यार्थ्यांनी या खेळाकडे आकर्षित होऊन देशाला नावलौकिक मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील इंटरनॅशनल WT तालकटोरा स्टेडियम वर हि स्पर्धा ऑल इंडियन तायक्वांदो फेडरेशन, इंडियन टिम 21 व 22 डिसेंबर रोजी स्पर्धेत हे खेळाडू सहभागी होणार आहे. यासाठी गावातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. या टिममध्ये सार्थक कृष्णा राठोड, वय 14, सौरभ संजय परमेश्वर, वय 12, उबेद अफरोज पठाण, वय 10, केशव देविदास वैष्णव, वय 11, हुमायू हाफिज इम्रान शेख हे खेळाडू या स्पर्धेसाठी जात आहे. ते गोल्ड मेडल घेऊन परत येतील यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
What's Your Reaction?