इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान सन्मानित, बिडकीनला 7 गोल्ड तर एक कास्य पदक...!

 0
इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान सन्मानित, बिडकीनला 7 गोल्ड तर एक कास्य पदक...!

इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान सन्मानित, बिडकीनला 7 गोल्ड, 1 कास्य पदक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांच्या मार्गदर्शनाखाली आठ ताईक्वांदो खेळाडू हैदराबाद येथे 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भाग घेतला.

हि स्पर्धा एल.बी.स्टेडियम, सरोरनगर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत गाजलेला पुष्पा-2 चे अभिनेता अलु अर्जुन, सुमन तलवारे, भानू चंदन गुरु, आमदार सुधीर रेड्डी गुरु, राम लक्ष्मण गुरु, स्पर्धेचे आयोजक पी.व्हि.श्रीरामुलू उपस्थित होते. इंटरनॅशनल कोच हाफिज इम्रान यांना विशेष सन्मान देत मान्यवरांनी सन्मानित केले.

बिडकीनच्या ताईक्वांदो खेळाडूंनी या स्पर्धेत आपला डंका कायम ठेवत 7 गोल्ड तर एक कास्य पदक पटकावले. या

या स्पर्धेत मुआज मुसा पठाण, हुमायून हाफीज इम्रान, आर्यन किशोर राठोड, रेहान असलम अतार, अनस हाफीज फिरदौस, मुबश्शिरा हाफिज इम्रान, अर्श अनिस शेख यानी गोल्ड मेडल तर राजरत्न अतुल निकम याने ताईक्वांदोत कास्य पदक पटकावले आहे. पदकांची कमाई केल्याने सर्व खेळाडूंचे बिडकीन व सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow