दोन जेष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकले, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

 0
दोन जेष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकले, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

दोन जेष्ठ नागरिक लिफ्टमध्ये अडकले, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) ज्योतीनगर येथील साईसागर अपार्टमेंट येथे लिफ्टमध्ये दोन जेष्ठ नागरिक अडकल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर तात्काळ जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बचावकार्यासाठी उपस्थित होते. लिफ्टमध्ये अडकलेले हरविंदर सिंह, वय 73, ह्रदयराज शर्मा, वय 77 यांना लिफ्टमधून सुखरूप काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले. मुख्य अग्निशमन अधिकारी संपत के.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे, अग्निशमन जवान संग्राम मोरे, केतन गाडगे, मोहम्मद मुझफ्फर, विजय कोथमिरे, शिवसंभा कल्याणकर, संकेत निकाळजे, वाहनचालक चंद्रसेन गीते यांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow