जटवाडा रोडवर मुले पकडणा-या दोन संशयितांना नागरीकांनी दिला चोप...! दिले पोलिसांच्या ताब्यात

जटवाडा रोडवर मुले पकडणा-या दोन संशयितांना नागरीकांनी दिला चोप...! दिले पोलिसांच्या ताब्यात...मुले चोरणारी टोळी सक्रिय झाली का...? नागरीकांमध्ये खळबळ...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) वार्ड क्रमांक 4, सईदा काॅलनी जवळ, जटवाडा रोडवर मुले पकडण्याच्या टोळी समजून दोन संशयितांना येथील नागरिकांनी रात्री 9 ते 10 वाजेच्या दरम्यान चोप दिला. यावेळी नागरीकांना हि माहिती मिळताच शेकडो नागरिकांचा जमाव येथे जमला होता. या घटनेमुळे मुले चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याने खळबळ उडाली. कपडे फटेपर्यंत अज्ञातांनी दोघांना मारहाण केली त्यामध्ये त्यांचे कपडे फाटले होते. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले. दोन अज्ञातांकडे एक विनानंबर मोटारसायकल व बॅगेत काही साहित्य होते. चोरीच्या इराद्याने तर हे लोक येथे आले नव्हते. किंवा मुले चोरीसाठी गल्लीत गेले होते का हे पोलिसांच्या चौकशीत समोर येईल. या घटनेत चार जण होते दोन पसार झाले अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. पण मुले चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे का यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे. पोलिसांनी याचा छडा लावावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
What's Your Reaction?






