मकब-यासमोर ड्रग्स तस्कराला अटक, 8 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी...

 0
मकब-यासमोर ड्रग्स तस्कराला अटक, 8 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी...

नशेचे औषध विकणाऱ्याला एकाला अटक, शक्तिशाली प्रबंधात्मक एलएसडी ड्रग्ज जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढणारी नशेखोरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील फोफावत असल्याची परिस्थिती आहे. जगभरात सर्वात शक्तिशाली ड्रग्जपैकी एक समजल्या जाणाऱ्या एलएसडीचे तस्कर आता शहरापर्यंत पोहोचले आहेत. उच्चभ्रू पार्ट्यांसह 'जनरेशन झेड'ला त्याचा लाखो रुपयात पुरवठा होत आहे. शहरातील अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने बेगमपुरा परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी आलेला तस्कर कादरी मारुफ अहमद शाहिद अहमदला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 0.09 ग्रॅमचे दहा कागदी तुकडे असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली.

 शहरातील नशेखोरी कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. मागील काही दिवसांत वेगवगेळ्या ठिकाणी छापे मारून कारवाई करत आहेत. त्यात बीबी का मकबरा परिसरात एक व्यक्ती प्रतिबंध असलेले ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी रात्री सापळा रचला, पोलिसांकडे असलेल्या वर्णनाचा एक व्यक्ती तिकीट घराजवळ उभा असलेला आढळून आला. त्यानुसार त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता कादरी मारुफ अहमद शाहिद अहमद असे त्याचे नाव त्याने सांगितले. त्याच्याकडे जगभरात सर्वात शक्तिशाली ड्रग्जपैकी एक समजल्या जाणाऱ्या एलएसडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. कागदाचे छोटे तुकडे ज्यावर विविध चित्र रेखाटलेले होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला 0.01 ग्रॅम ड्रॅग्ज होते, त्याच्याकडून असे 9 तुकडे जप्त करण्यात आले.

दुबईमध्ये आरोपी होता कामाला : अटक करण्यात आलेल्या तरुणाने एमबीएची पदवी घेऊन दुबईत नोकरी केली. मात्र काही दिवसांनी त्याने नोकरी सोडली. त्यानंतर त्याने पुण्यामध्ये नोकरी शोधली आणि पुण्यामध्ये एका पार्टीत त्याची आंतरराष्ट्रीय टोळीसोबत ओळख निर्माण झाली. त्यामधूनच त्यांनी ड्रग्सचा व्यवसाय सुरू करत शहरामध्ये तो हळूहळू करून चोरटी विक्री करू लागला. त्याच्याकडून 10 एलएसडी पेपर आणि मोबाईल हँडसेट जप्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी व्ही. एस. देशमुख यांनी 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow