खुलताबाद रोडवर पेट्रोल पंपाची तोडफोड, 8 जणांवर गुन्हा दाखल

 0
खुलताबाद रोडवर पेट्रोल पंपाची तोडफोड, 8 जणांवर गुन्हा दाखल

खुलताबाद मार्गावर प्रल्हाद पेट्रोल पंपाची तोडफोड; खुलताबाद मधील धक्कादायक घटना

तोडफोड करतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खुलताबाद,दि.24(डि-24 न्यूज )शहराबाहेरील पेट्रोल पंपावर गोंधळ घालणार-या 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. डिझेलचे पैसे देण्यावरुन वाद खुलताबाद शहराबाहेरील औरंगाबाद रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या डिझेलच्या बिलाचे पैसे देण्या वरुन चांगलाच वाद झाला. सदरील घटना बुधवारी (ता.22) दुपारी चारच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पंपावरील काम करणारे संतोष सर्जेराव वाघ,राहणार भद्रा कॉलनी खुलताबाद यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन 8 जणांविरुध्द खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बुधवारी (ता.22) आपण इतर कर्मचा-यांसह पंपावर काम करीत होतो. दुपारी साडे तीन दरम्यान दोन तरुण ट्रॅक्टर घेवुन आले,त्यांनी या ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकुन घेतले, या नंतर कामावर असलेले वाघ यांनी पैशांची विचारणा केली असता

त्यांनी ऋषिकेश बोडखे यांच्यांशी बोलणे करुन दिले. त्यावेळी बोडखे यांनी पे टी.एम‌.चे स्कॅनर पाठवण्यास सांगितले,मात्र या दरम्यान स्कॅनरचा टाईम झाल्याने,मी त्यांना प्रत्यक्ष येथून पैसे देण्यास सांगितले. मात्र ते एका कारमध्ये अन्य साथीदारांना घेवुन आले,अन गोंखळ सुरु केला, तेथील इंडियन ऑईलच्या मालकीचे पे.टी.एम. मशीन आपटुन फोडुन टाकले,यात आठ लाखाचे नुकसान झाले. त्यानंतर माझ्यासह इतर कर्मचा-यांना मारहाण सुरु केली, सदरील घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पोलीस फौजफाटा सह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ऋषिकेश बोडखे यांस पोलीसांनी स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तेथील पेट्रोल नळीचे नोझल काढुन पेट्रोल अंगावर ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुरवठा बंद असल्याने अनर्थ टळला. या प्रकरणी वाघ यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन ऋषिकेश बोडखे, आकाश बोडखे, विशाल तुपे, संदीप तंबारे, वाल्मिक वरकड, गणेश गायकवाड, अभ्या उर्फ अभिजित तुपे, सिध्दांत घुसळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनाची तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळी हे आहेत. ऋषिकेश बोडखे हा पोलीसांना म्हणाला की, प्रत्येक वेळी हिन्दुनीच माघार घ्यायची का ? असे म्हणून सदर घटनेला जाणुनबुजुन हिंदू-मुस्लीम जातीय वादाचे वळण देण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने 15 ते 20 मिनिट गोंधळ घातल्यामुळे पेट्रोल पंचाचे परिसरात व खुलताबाद ते औरंगाबाद मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी झाली होती. त्यावेळी हिंदू मुस्लीम गटात वाद व हाणामारी झाल्याची अफवा वाऱ्या सारखी खुलताबाद शहर सह परिसरात पसरली होती. पोलिसांनी तणाव शांत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow