आंतरजातीय विवाहाचा राग अनावर, तरुणावर भाऊ भावजयीने केले वार
आंतरजातीय विवाहाचा राग अनावर, तरुणावर भाऊ भावजयीचा ब्लेडने वार...
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज )आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने आणि भावजयीने तरूणाच्या डोळ्यात माती टाकून ब्लेडने प्राणघातक वार करत जीवघेणा हल्ला केल्याची घटना 17 मे रोजी रात्री साडेआठ वाजता चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात घडली. या प्रकरणी भाऊ आणि भावजयी विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय विश्वनाथ भालेराव वय 30 राहणार बजरंगनगर, चिकलठाणा याने तक्रार दाखल केली. संजय याने आंतरजातीय विवाह केला आहे. तो 17 मे रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास हिनानगर भागातून जात असताना, त्याला त्याचा मोठा भाऊ रविंद्र विश्वनाथ भालेराव वय 35 आणि त्याच्या पत्नीने अडवले. संजयच्या वहिनीने त्याच्या डोळ्यात माती टाकली. तर भाऊ रविंद्रने संजयला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला आणि हातावर ब्लेडने वार केले. मारहाणीत संजयच्या शरिरावर अनेक ठिकाणी वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या तक्रारीवरुन भाऊ व भावजयीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक फौजदार मुंडे हे तपास करत आहे.
What's Your Reaction?