दौलताबादेत गुन्हे शाखेने पकडला 32 लाखांचा गुटखा...!

दौलताबादेत गुन्हे शाखेने पकडला 32 लाखांचा गुटखा...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) -
धुळे-सोळापुर मार्गाने माळीवाडाच्या दिशेने काळी ताडपत्री झाकलेला अवैध गुटख्याचा आयशर ट्रक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने आयशर क्रं.MH-18,CY-7507 हा ट्रक पकडला. आयशरची पंचासमक्ष अन्न सुरक्षा अधिकारी यांनी झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या हिरा पान मसाला 80 गोणी, राॅयल 717 तंबाखू रंगाच्या 13 गोणी तर विविध रंग असलेल्या 26 गोण्या अशा एकुण 16,70,760(सोळा लाख सत्तर हजार सातशे साठ रुपये) किमतीचा गुटखा मिळून आला. अवैध गुटखा, आयशर व मोबाईल मिळून एकूण 32,93,760 मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी गोकुळ रामप्रभु गळकर, वय 37, व्यवसाय चालक, पत्ता रा.मु.कुटेवाडी, पो.पारनेर, ता.पाटोदा, जि.बीड याला अटक केली. दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण वाघ, पोअं सोमकांत भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी केली.
What's Your Reaction?






