राहुरी, वकील दाम्पत्याचा निर्घृण खुनाच्या घटनेचा निषेध, वकील संघाने केले लेखनी बंद आंदोलन

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सिल्लोड तालुका वकील संघातर्फे लेखणी बंद ठेवण्यात येऊन जाहीर निषेध...
अधिवक्ता सुरक्षा अधिनियम तात्काळ अमलबजावणी करण्याची एकजुटीने मागणी...
सिल्लोड, दि.29 (डि-24 न्यूज) सिल्लोड तालुका वकील संघाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा लेखणी बंद करून जाहिर निषेध नोंदविला असून त्या अनुषंगाने तातडीची आज वकील संघाचा दालनामध्ये अध्यक्ष ॲड. अशोक दादा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील व्यवसायाने वकील असलेल्या ॲड. आढाव दांपत्याचा प्रचंड छळ करून निर्गुण खून करणाऱ्या आरोपी आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या मूळ गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे. प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावे, या आशयाने ठराव पारित करण्यात आला. यावेळी तालुका वकील संघाचे वतीने अधिवक्ता सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी शासनाने तात्काळ करावी, अशी मागणी एकमुखाने मांगणी करण्यात आली. सदर ठरावाची प्रत आणि निवेदन हे तहसीलदार सिल्लोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह सर्व संबंधितांना देण्यात आले.
यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक तायडे तसेच उपाध्यक्ष ॲड. संतोष झाल्टे, ॲड. रवींद्र ताठे, ॲड. एच.के. खान यांच्यासह ॲड. जी. एस. आरके, ॲड.एस.जी. डावरे, ॲड. ए. व्ही.देशपांडे, ॲड. एस. के. ढाकरे, ॲड. विजय मंडलेचा, ॲड. शेख उस्मान, ॲड. जी. व्ही. ढोणे, ॲड. एस. आर. काकडे, ॲड. रिजवान पठाण, ॲड.निकाळजे, ॲड. मिलिंद जाधव, ॲड. जैवळ, ॲड. निलोफर खान, ॲड. पूजा काळे, ॲड. चाटे आदी वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
What's Your Reaction?






