शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी, 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण, 24 तासात चैतन्य तुपेची सुखरूप सुटका

 0
शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी, 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण, 24 तासात चैतन्य तुपेची सुखरूप सुटका

शहर पोलिसांची जबरदस्त कामगिरी, 2 कोटी खंडणीसाठी अपहरण केलेल्या चैतन्य तुपेची 24 तासांच्या आत सुटका...

शहर पोलिसांचे सर्वत्र होत अभिनंदन...

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5 (डि-24 न्यूज) - 2 कोटींची खंडणीसाठी शहरातील उच्चभ्रू वस्ती एन-4 सिडको येथील 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची खळबळजणक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली होती. या अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन अवघ्या 24 तासांच्या आत 5 आरोपींना ताब्यात घेऊन अपहरण करण्यात आलेल्या जालना जिल्ह्यातून चैतन्य सुनील तुपे याची सुखरूप सुटका गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील चैतन्य तुपेचे अपहरणातून सुखरूप सुटका केल्यानंतर त्यांनी यावेळी माहिती दिली. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, संभाजी पवार, निता बागवडे आदींची उपस्थिती होती.

बांधकाम व्यवसायिक सुनील भाऊसाहेब तुपे यांचा 7 वर्षाचा मुलगा चैतन्य तुपे हा घराजवळील मोकळ्या मैदानात सायकल खेळत होता. रात्री पावणेआठ वाजता चैतन्यचे बनावट नंबरची बलेनो कारमध्ये अपहरण केले होते. मुलगा मैदानातून परत न आल्याने ते शोधाशोध करत असताना त्यांना अनोळखी नंबरहून कॉल आला. त्यावर बोलणार्‍या व्यक्तीने तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर 2 कोटी रुपये द्या, असे म्हणून कॉल बंद केला. त्यामुळे आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचे सुनील तुपे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती पुंडलिकनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच कॉल आलेल्या नंबरचे लोकेशन पाहिले असता ते शहराबाहेरचे असल्याचे समोर आले.

शहरातील उच्चभ्रू वस्तीतून अपहरणाची माहिती समोर येताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या अपहरणाची माहिती सर्वच पोलीस ठाण्याला कळवून तात्काळ नाकेबंदी करण्याचे आदेश दिले. जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक, जालना ग्रामीण पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, आहिल्यानगर, जळगाव, नाशिकसह सर्वच पोलीस अधिक्षकांनासह राज्याच्या सिमारेषालगत असलेल्या आरटीओच्या चेकपोस्ट, वन विभागाचे चेकपोस्ट आदींना या अपहरणाबद्दलची माहिती दिली. त्यामुळे सर्वच पोलीस प्रशासनासह सर्वच विभाग खडबडून जागे होऊन जागोजागी नाकेबंदी सुरू केली.

अपहरणातील कारला अपघात....

शहरातून चैतन्यचे अपहरण करून सिल्लोड भोकरदन मार्गे पळून जात असताना अपहरणकर्त्यांच्या गाडीला माहोराकडे जाताना मोठा अपघात झाला. त्यात अपहरणातील आरोपी प्रणव समाधान शेवत्रे (19, रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद, जि. जालना) हा जखमी झाला होता. त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयांकडून मिळालेल्या वर्णनाच्या कारचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयातील जखमी प्रणव शेवत्रे यास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने अपहरणातील इतर आरोपींची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ब्रह्मपुरी (ता.जाफराबाद, जि.जालना) येथून शिवराज ऊर्फ बंटी विलास गायकवाड (20, रा. आळंद, ता. जाफराबाद), हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (21, रा. ब्रम्हपूरी, ता. जाफराबाद) यांच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या गावातील जीवन नारायण शेवत्रे (26), कृष्णा संतोष पठाडे (20, दोघेही रा. ब्रम्हपूरी) यांना अटक केली.

 खंडणीसाठी चैतन्यकडून मिळविला वडिलांचा मोबाईल नंबर

चैतन्यचे अपहरण करून त्याला बळजबरीने गाडीत बसून घेतले होते. एका आरोपीने त्याची सायकल रस्त्याच्या कडेला फेकून दिली. चैतन्यकडून अपहरणकर्त्यांनी वडिलांचा मोबाईल नंबर मिळविला. त्या मोबाईलवरून खंडणीची 2 कोटींच्या मागणी केली होती. त्यानंतर तो मोबाईल बंद करून टाकल्याने पोलिसांना शोध लावणे कठीण झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow